प्रशांत श्रीमंदीलकर, आळंदी, पुणे : पुण्यातील पोर्श कार अपघाताचं प्रकरण ताजं असताना आणखी एक तशीच घटना समोर आली आहे. खेड तालुजातील आळंदीजवळ असणाऱ्या वडगाव घेनंद या गावात एका अल्पवयीन मुलाने महिलेच्या अंगावर गाडी घालत तिला मारण्याचा प्रयत्न केला. जुन्या भांडणाचा राग मानत धरून भरधाव वेगात कार चालवून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न अल्पवयी मुलाने केला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकाराने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
याबाबत अधिक माहिती अशी की, आळंदीजवळ असलेल्या वडगाव घेणंद येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका अल्पवयीन कार चालकाने महिलेसह नागरिकांना भरधाव कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या कार चालकाने सुरुवातीला कार बऱ्याच अंतरावर रिव्हर्स घेऊन मग कार पुन्हा वेगाने चालवून महिलेला जोरात धडक दिली. त्यानंतर अप्लवयीन कार चालक घटनास्थळावरुन निघून गेला.
अंगावर शहाहारे आणणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भरधाव कार महिलेच्या अंगावर घालत तिला चिरण्याचा प्रयत्न अल्पवयीन तरुणाने केला, शिवाय तो इतक्यावरच न थांबता त्याने गाडीच्या टपावर बसून शिवीगाळ देखील केली. या प्रकरणी आळंदी पोलिसांत नाजुका थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेनंतर पुण्यात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलाने गाडी चालवून अपघात घडवण्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या अल्पवयीने मुलांकडे लक्ष देण्याची, तसंच त्यांच्या हातात कार देणं कितपत योग्य आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. पुणे आणि परिसरात बड्या व्यक्तींच्या अल्पवयीन मुलांच्या हातात गाड्या देणं नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. यावर पोलिसांकडून कारवाई होण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांडून व्यक्त होत आहे. १७ जून रोजी घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबल उडाली आहे. अचानक घडलेल्या या घटनेने या भागात काही वेळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.