महिला बाजरी राखायला शेतात गेली, समोरून बिबट्या आला अन् तेवढ्यात..

पुणे – जिल्ह्यातील जुन्नर तालुका हा ‘बिबट्यांचा’ तालुका म्हणून ओळखला जातो. त्यात तो मानवी वस्तीकडे वळू लागला असून त्याने आजूबाजूच्या परिसरातील अनेकांचे जीव घेतले आहेत. अशीच घटना आज जुन्नर तालुक्याच्या पिंपरी पेंढार गावात घडली आहे. एक महिला बाजरी पिकाचे राखण करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्या महिलेवर हल्ला केला. नानुबाई कडाळे असं महिलेचं नाव असून तिला फरफटत नेऊन तिचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. सकाळी सव्वा आठच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं ?

नानुबाई कडाळे या शेतात असणाऱ्या बाजरी पिकाचे राखण करण्यासाठी गेल्या होत्या. अशातच शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. आणि त्यांना फरफटत उसाच्या शेतात नेऊन ठार मारले. या संपूर्ण प्रकारची माहिती मिळताच परिसरात नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते.
Narendra Dabholkar Murder Case: डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात दोघांना जन्मठेप, तिघांची सुटका; CBIच्या विशेष न्यायालयाचा निकाल

नातेवाईकांनी प्रशासनाच्या कारभारावर फोडले खापर

मृत पावलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी आक्रोश करत प्रशासनाच्या कारभारावर खापर फोडलं आहे. आमच्या घरातील व्यक्ती भर दिवसा बिबट्याने नेली, आता आम्ही काय करायचं कोणाकडे बघायचं. असे म्हणत वनविभागाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांसमोर संताप व्यक्त केला आहे.
मंत्री व्हायला निघालास? पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो! अजितदादांचं आता कोणाला आव्हान?

बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करा

दरम्यान, घडलेल्या घटनेमुळे तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. मागील आठ दिवसांपासून बिबट्याचे हल्ले वाढू लागले आहेत.बिबट्याचे हल्ले असेच सुरू राहिले तर माणसं कमी आणि बिबटे अधिक अशी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही. अशी भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच वन विभागाने बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपायोजना करण्याची मागणी सुद्धा नागरिकांनी केली आहे.