महाराष्ट्रात काँग्रेसची विचारधारा नैसर्गिकपणे रुजलेली, हे काँग्रेसी विचारांचे राज्य : राहुल गांधी

पुणे : महाराष्ट्र हे काँग्रेसी विचारांचे राज्य असून, काँग्रेसची विचारधारा मराठी माणसाच्या रक्तात आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. त्याचवेळी इथले काँग्रेसचे नेतेही ‘बब्बर शेर’ असून, जनता आमच्या पाठीचा कणा आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

इंडिया व महाविकास आघाडीचे पुणे लोकसभा उमेदवार रवींद्र धंगेकर, बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ ‘एसएसपीएमएस’ संस्थेच्या मैदानावर आयोजित प्रचारसभेत राहुल गांधी बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार रजनी पाटील, चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, नसीम खान, रमेश बागवे, आमदार संग्राम थोपटे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आबा बागुल, शहराध्यक्ष अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.
‘आपण PM आहात’, मोदींच्या शरद पवारांवरील टीकेचा राहुल गांधींकडून पुण्यात समाचार

महाराष्ट्र हे काँग्रेसी विचारांचे राज्य

‘महाराष्ट्रात आल्यावर कायमच आनंद होतो, कारण इथल्या लोकांच्या रक्तात आणि हृदयात काँग्रेसची विचारधारा नैसर्गिकपणे रुजलेली आहे. स्वातंत्र्याची चळवळ, फुले-आंबेडकर-गांधी-नेहरू विचार सर्वांच्या रक्तात असून, तो कोणालाही बाहेर काढता येणार नाही. इथले काँग्रेसचे नेतेही ‘बब्बर शेर’ असून, जनता आमच्या पाठीचा कणा आहे. देशात परिवर्तन घडविण्यासाठी तुम्ही आपल्या शक्तीला ओळखा,’ असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले.
मोदींकडून शरद पवारांचा भटकती आत्मा म्हणून उल्लेख, ठाकरेंचा पलटवार, म्हणाले- एक वखवखलेला बुभुक्षित आत्मा…

नरेंद्र मोदी यांनी राजकारणाची थट्टा चालविली आहे

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणाची थट्टा चालविली आहे. ते शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांविषयी उलटसुलट बोलून त्यांचा अपमान करत आहेत. पंतप्रधानांनी थोडी तरी पातळी राखली पाहिजे आणि देशाच्या विकासाविषयी बोलले पाहिजे,’ अशा खरमरीत शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर दिले.
गुन्हेगारांनाही संरक्षणाची मोदीहमी आहे का? प्रज्वल प्रकरणी राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

पंतप्रधान मोदी यांनी पुण्यातील ‘रेसकोर्स’ मैदानावर आयोजित प्रचारसभेत शरद पवार यांच्यावर ‘भटकती आत्मा’ अशी अप्रत्यक्ष बोचरी टीका केली होती. त्यावर ‘शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करून पंतप्रधानांचा काय फायदा होणार आहे, त्यामुळे हिंदुस्थानची जनता आनंदी होणार नाही. उलट सामाजिक आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा हटविणार का, जातिनिहाय जनगणना करणार का, असे जनतेचे प्रश्न असून, त्याची उत्तरे मोदी देत नाहीत,’ असे राहुल गांधी यांनी सुनावले.

मोदींनी रेवण्णासाठी मते मागितली

‘कर्नाटकातील उमेदवार प्रज्वल रेवण्णा याने चारशे महिलांवर बलात्कार केला आहे. भाजपच्या आमदाराने या संदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्रही लिहिले होते. ही बाब पंतप्रधान मोदींनाही ठावूक होती. तरीही रेवण्णावर कोणतीही कारवाई न करता त्याच्यासाठी मते मागितली,’ असा आरोप राहुल गांधी यांनी केला.