काय आहे सुषमा अंधारे यांची पोस्ट?
शिवीगाळ करणे योग्य नाही. असे अपशब्द वापरणाऱ्याचे निलंबन करायला हवे, हे शहाणपण गिरीश महाजनांना तेव्हा का सुचले नाही, जेव्हा रमेश बिधूडी नावाचा खासदार दानिश आली बद्दल अत्यंत अभद्र भाषेत बोलत होता. किंवा संजय शिरसाट, अब्दुल सत्तार यांच्यासारखी माणसं महिलांबद्दल गलिच्छ भाषेत बोलत होती. असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभागृहात भाजप आमदार प्रसाद लाड यांना उद्देशून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
प्रसाद लाड यांचे आंदोलन
याआधी, अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्याबद्दल त्यांचे निलंबन व्हावे आणि त्यांनी सभागृहाची माफी मागावी, या मागणीसाठी आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले होते.
माझी आई कॅन्सरसारख्या दुर्धर आजारामुळे २५ वर्षांपूर्वी वारली. अंबादास दानवे यांनी वापरलेल्या अपशब्दांमुळे माझ्या मनाला खूप वेदना झाल्या आहेत, मी काल रात्रभर झोपू शकलो नाही, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी मंगळवारी सकाळी दिली होती.
सभागृह तहकूब
तर भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर अंबादास दानवे यांच्या अपशब्दांचा मुद्दा काढला. यावर सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निर्णय घेण्यास वेळ मागितला. परंतु गोंधळ कमी होत नसल्याने सभागृहाचे कामकाज पुन्हा एक तासासाठी तहकूब करण्यात आले होते.