आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रसाद ठराव करावा, प्रसाद लाड यांची मागणी
रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने १७ वर्षानंतर टी ट्वेन्टी विश्वकरंडक जिंकला. त्यामुळे विधिमंडळाने सर्वानुमते अभिनंदनाचा ठराव करावा आणि बीसीसीआयला पाठवावा, आपल्याच विधिमंडळातील विधानसभेचे सदस्य आशिष शेलार हे BCCI चे खजिनदार आहेत. त्यांचेही सभागृहाने अभिनंदन करावे, असे भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले.
विरोधकांचा सभागृहात गोंधळ
त्यांच्या सूचनेवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी तीव्र आक्षेप नोंदवत हा काय प्रकार काय? भारतीय संघाच्या विजयाचे श्रेय तुम्हाला हवे आहे का? असले प्रकार चालूच कसे शकतात? असे सवाल मविआ आमदारांनी उपस्थित करून सभागृहात गोंधळ केला. त्यावर त्यांनी काय बोलायचं, ते तुम्ही ठरवणार का? याच्याआधी असे ठराव आपण केले नाहीत का? आपलाच माणूस आहे (आशिष शेलार) ना खालच्या सभागृहात एवढा काय दुस्वास… असे म्हणत प्रविण दरेकर यांनी प्रसाद लाड यांची बाजू घेतली.
या प्रकरणी, प्रस्तावात कुणाचे नाव घालायचे, याचा निर्णय मी घेणार आहे, त्यामुळे तुम्ही असहिष्णू वागू नका, अशा स्पष्ट सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मविआ आमदारांना दिल्या