मुंबई: मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपची युती तुटली. उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा करत सत्ता स्थापनेची तयारी सुरु केली. तितक्यात पहाटेचा शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस ‘पुन्हा आले’ आणि कोणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक मुख्यमंत्री झाले. त्यांनी खुर्ची मिळवली. पण ती ७२ तासच टिकली. अजित पवारांचं बंड फसलं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचं सरकार गेलं. पण अडीच वर्षांतच ठाकरेंचं सरकार कोसळलं. भाजपनं खुर्ची मिळवली. पण मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदेंना देण्यात आलं. तर देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपद मिळालं. ज्या खुर्चीवरुन हे सारं महाभारत घडलं, त्याच खुर्चीचा विषय आता पुन्हा चर्चेत आला आहे.
विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाऊ, असं फडणवीस एका मुलाखतीत म्हणाले. विधानसभेच्या जागावाटपात मित्रपक्षांचा सन्मान राखण्यात येईल. पण ज्या पक्षाच्या अधिक जागा निवडून येतील, त्यांचाच मुख्यमंत्री होईल असं सूत्र असेलच हे सांगता येणार नाही, असं विधान फडणवीस यांनी केलं. यावेळी त्यांनी सध्याच्या परिस्थितीचा संदर्भ दिला. आताही भाजपचे ११५ आमदार आहे. पण एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय भाजपचं संसदीय मंडळ घेईल, असं फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांच्या विधानाचा नेमका अर्थ काय? भाजप महाराष्ट्रात ‘बिहार पॅटर्न’ राबवतंय का? अशी चर्चा सुरु झाली आहे. शिंदेंना मुख्यमंत्रिपदी ठेऊन भाजप मित्रपक्षांना अधिकाधिक खूष ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्याचवेळी भाजपनं अनेक महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. बिहारमध्येही संयुक्त जनता दलाच्या नितीश कुमारांच्या मागे केवळ ४३ आमदारांचं बळ असूनही भाजपनं त्यांना मुख्यमंत्रिपद दिलं आहे. भाजपचे ७४ आमदार असूनही त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद आहे. त्यामुळे भाजप महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
२०२० मध्ये बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जदयुच्या जागा लक्षणीय प्रमाणात घटल्या. मात्र तरीही भाजपनं त्यांना मुख्यमंत्रिपद दिलं. भाजपकडून दोन नेत्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री आहेत. फरक इतकाच आहे की त्यातील एकच उपमुख्यमंत्री भाजपचा आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्री देऊन भाजपनं राष्ट्रवादीला खूष ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यात मराठा मतांचं प्रमाण लक्षणीय आहे. एकनाथ शिंदे मराठा समाजातून येतात. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय तापलेला असताना भाजप मराठा मुख्यमंत्र्याला दूर करण्याची जोखीम पत्करण्याची शक्यता कमीच आहे. शिंदेंच्या रुपात असली शिवसेना आपल्यासोबत असल्याचा दावा भाजपकडून केला जातो. शिंदेंना ताकद दिल्यास ठाकरेसेनेला बॅकफूटवर ढकलणं भाजपला सोपं जातं.

उद्धव ठाकरे जितके प्रभावी ठरतील, तितकं शिंदेंचं महत्त्व असेल. ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपला शिंदेंची गरज आहे. बिहारमध्ये भाजपनं सम्राट चौधरी यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद दिलं आहे. मोठी जबाबदारी देण्याच्या दृष्टीनं भाजप त्यांना तयार करत आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याही बाबतीत हेच घडणार का, ते पाहणं महत्त्वाचं असेल.