मुंबई: विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना भाजपनं आता विधान परिषदेवर संधी दिली आहे. भाजपकडून पाच नावांची घोषणा विधान परिषदेसाठी करण्यात आली आहे. त्यात पंकजा मुंडेंच्या नावाचा समावेश आहे. भाजपनं तीन ओबीसी, एक मराठा आणि एक दलित अशा पाच जणांना संधी देत सोशल इंजिनीअरिंग साधलं आहे. विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं.
विधान परिषदेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पंकजा मुंडे विधानभवनात पोहोचल्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानसभेत झालेल्या पराभवानंतरही पाच वर्षे लोकांची सेवा अविरतपणे सुरु ठेवली. त्यामुळे लोकसभेला संधी मिळाली. पण थोड्या मतांनी पराभव झाला. आता पक्षानं मला विधान परिषदेसाठी संधी दिली आहे. त्यामुळे पक्षाची आभारी आहे. पाच वर्षे अविरत सेवा सुरु ठेवल्यानं इथं पोहोचू शकले, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या.
राजकारणाच्या माध्यमातून लोकांची सेवा करता येते. घटनात्मक पदावर असल्यास जनतेला न्याय देणं सहज शक्य होतं. जनतेला न्याय देताना पक्षाची शक्ती बळकट करण्यासाठी योगदान देणं आमचं कर्तव्य आहे. मला दिलेल्या संधीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, कोअर कमिटीचे सगळे सदस्य, प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या सगळ्यांचे आभार मानते, अशी प्रतिक्रिया मुंडेंनी दिली.

तुम्हाला विधान परिषदेसाठी देण्यात आलेली उमेदवारी येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून देण्यात आली आहे का, असा प्रश्न पंकजा मुंडेंना विचारण्यात आला. त्यावर या संधीकडे त्या दृष्टीकोनातून पाहण्याचं कारण नाही. पण जरी तसं असेल, पक्षानं भविष्याचा विचार करुन निर्णय घेतला असेल तर त्या परीनं योगदान देण्याचा माझा प्रयत्न राहील, असं उत्तर मुंडेंनी दिलं. राज्यसभेपेक्षा मी इथे जास्त आनंदी असल्याचं मुंडे विधानभवनात जाता जाता म्हणाल्या.