पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघासाठी आज, मंगळवारी होणाऱ्या मतदानावेळी मतदारसंघातील १५७ पेक्षा अधिक मतदान केंद्रावर काही गैरप्रकार होण्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्याकडे त्यांनी लेखी तक्रार केली आहे. आम्ही पोलीस बंदोबस्त चोख ठेवल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
देशपातळीवर बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चर्चेत आहे. त्यामुळे बारामती कोणाची होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कुटुंबात ही लढाई होत असून मतदार कोणाकडे झुकणार याबाबतही उत्सुकता लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर, मतदारसंघातील १५७ मतदान केंद्रावर गैरप्रकार होण्याची भीती सुळे यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे. तसेच त्याबाबत खबरदारीचे उपाय करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. लेखी पत्र तसेच ई मेलद्वारे तक्रारही त्यांनी केली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातील शहरातील १२, ग्रामीण भागातील ४७, दौंडमधील ३३, पुरंदर आणि भोरमधील प्रत्येकी ३१ आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील तीन अशा १५७ मतदान केंद्रावर गैरप्रकार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांची तक्रार आली आहे. त्यात ठोस कारण दिलेले नाही. मात्र, तरीही सर्व विधानसभा मतदारसंघांच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आम्ही दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेशही दिले आहेत,’ अशी प्रतिक्रिया बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली.