मला भुलीचे इंजेक्शन दिले होते
याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली होती की, ”१९ जूनला मला मी काम करत असलेल्या ठिकाणाहून माझा पती, सासरा आणि चालक यांनी फरफटत नेऊन माझे अपहरण केले होते. त्यानंतर मला तिघांनी गाडीतच डांबून ठेवत मला भुलीचे इंजेक्शन दिले होते”. पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवाहित महिलेचे २०२३ मध्ये मंचरमध्ये सुमितसोबत लग्न झाले आहे. लग्नाच्या आठवड्याभरानंतर पती सुमितने विवाहितेकडे नको त्या मागण्या सुरु केल्या. मात्र पत्नीने त्या पूर्ण करण्यास नकार दिला. त्यानंतर ती सुमितपासून वेगळी राहू लागली. त्यानंतर तिने पिंपरी चिंचवड येथे नोकरीसाठी आली. याची माहिती सुमितला मिळाली. त्यानंतर सुमितने तीला ऑफिसपासून गाडीपर्यंत फरफटत नेलं. त्यानंतर सुमितने तीला भुलीचे इंजेक्शन दिले. तीला घरी न नेता गाडीतच डांबून ठेवले. त्या दरम्यान तो तीला वारंवार भूल देत होता. त्यानंतर एका ठिकाणी गाडी थांबल्यानंतर तिने स्वतःची सुटका करून घेत थेट वाकड पोलिसांत आपली तक्रार नोंदवली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.