बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर, आरोपीचा मोबाईल, दुसऱ्याचा हॉटस्पॉट आणि बरंच काही…

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पोलीस संबंधित प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला जवळपास दीड महीना उलटून गेला आहे. दसऱ्याच्या दिवशी म्हणजे 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील झिशान सिद्दीकीच्या ऑफीसबाहेर तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या केली. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने ओळख पटू नये म्हणून मजुराच्या हॉटस्पॉटचा वापर केल्याचं तपासात उघड झालं आहे.

पंजाबमधील फाजिल्का येथून अटक करण्यात आलेल्या आरोपी आकाशदीप गिल याने त्याच्या शेतात काम करणाऱ्या एका मजुराच्या मोबाइल हॉटस्पॉटचा वापर केला आहे. मजुराच्या हॉटस्पॉटचा वापर करत मास्टरमाइंड अनमोल बिश्नोई, सहकारी शुभम लोणकर आणि जीशान अख्तर तसेच शूटर शिवा कुमार गौतम यांच्याशी संवाद साधल्याचे तपासात समोर आलं आहे

बलविंदर नावाच्या या मजुराने गुन्हे शाखेला खळबळजनक माहिती दिली आहे. इंटरनेट कॉलिंगसाठी आरोपीने मजुराच्या हॉटस्पॉटचा वापर केल्याची माहिती समोर आहे. चौकशी दरम्यान आरोपी आकाशदीप गिल याने हॉटस्पॉट संबंधी कबुली दिली आहे. क्राइम ब्रँच सध्या गिलच्या मोबाईलचा शोध घेत आहे.

ज्यामुळे या प्रकरणातील गंभीर माहिती पोलिसांना हाती लागू शकेल… सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशदीप गिल याने हत्येसाठी लॉजिस्टिक आणि कम्युनिकेशनचे समन्वय साधले होते. सध्या याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार आणि हत्या…

ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली. त्यानंतर गुडं लॉरेन्स बिष्णोई याने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वीकारली. अभिनेता सलमान खान याची जो कोणी मदत करेल त्यानं स्वतःचा हिशेब करून ठेवावा… असं धमकी पत्रातून देण्यात आली. त्यानंतर अनेकदा सलमान खान जीवेमारण्याच्या धमक्या देखील आल्या आहे.

एवढंच नाही तर, बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी देखील लॉरेन्स बिष्णोई आणि बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आहे. अन्य लोकांना देखील लॉरेन्स याने जीवेमारण्याची धमकी दिली आहे. फक्त भारतात नाही तर, भारताबाहेर देखील बिष्णोई गँगचं जाळं पसरलेलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)