प्रवेशानंतर महिनाभरात पडताळणी अर्ज
दहावी आणि बारावीच्या नंतरच्या पदविका प्रवेशांसाठी जात/जमात वैधता प्रमाणपत्र आवश्यक नाही. मात्र, प्रथम वर्ष पदविका किंवा द्वितीय वर्षातील पदविका अभ्यासक्रमाच्या राखीव जागेवर प्रवेश मिळालेल्या मागासवर्गीय उमेदवाराने प्रवेश मिळाल्यापासून एका महिन्याच्या आत जात, जमात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी संबंधित जात, जमात पडताळणी समितीकडे योग्य भरलेला अर्ज सादर करावा लागेल, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
प्रवेश घेणाऱ्यांसाठी महत्त्वाचे…
– जात प्रमाणपत्र, जमात वैधता प्रमाणपत्र आवश्यकतेनुसार आवश्यक.
– पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या मागासवर्गीयांच्या राखीव जागेवर प्रवेशासाठी मागासवर्गीय उमेदवाराने जात, जमात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
– अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व्यतिरिक्त उर्वरीत सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक आहे.
– राज्याबाहेरील मागासवर्गीय उमेदवारांचा अधिवास महाराष्ट्र राज्यात असला, तरी राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या आरक्षणाचे धोरण त्यांना लागू नाही.
– ‘टीएफडब्ल्यूएस’ योजनेंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
– आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठी वैध असलेले ‘ईडब्ल्यूएस’ प्रमाणपत्र.
– आधार क्रमांक व संलग्नित बँक खाते शिष्यवृत्ती, शुल्क प्रतिपूर्ती आदी योजनांची रक्कम थेट लाभार्थीच्या खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक.