मुंबई: भिवंडी लोकसभा मतदारसंघातून यावेळी महायुतीकडून विद्यमान खासदार कपिल पाटील तर महाविकास आघाडीकडून सुरेश बाळ्या मामा म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बाळ्या मामा यांच्या प्रचाराची धुरा ज्यांच्या हाती आहे ते समाजवादी पक्षाचे मराठी मुस्लीम आमदार रईस शेख यांनी भिवंडी आणि बदलापूरकरांना मोठं आश्वासन दिलं आहे. गेल्या महिनाभरापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी प्रचार करणारे रईस शेख हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या मटा कॅफे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भिवंडी आणि बदलापूरकरच्या ट्रान्सपोर्टच्या मुद्द्यावर सरकार येताच वर्षभरात तोडगा काढू असं वचन दिलं आहे.
भिवंडीसाठी मोठा प्लॅन तयार, वर्षभरात तोडगा काढणार – रईस शेख
भिवंडीसाठी मोठा प्लॅन तयार, वर्षभरात तोडगा काढणार – रईस शेख
लोकल किंवा कनेक्टिव्हीटीसाठी एक मोबिलिटी प्लान केलेला आहे. ट्रेन, मेट्रो, छोट्या बसेस अशा सुविधा त्यात असेल. माझं वचन आहे की, बाळ्या मामा म्हात्रे जिंकून आले तर वर्षभरात मोबिलिटीचं सोल्युशन देणार. कारण, बसेसचं टेंडर रेडी आहे, फक्त लोकल नाही तर मेट्रो, बस, रिक्शा, पब्लिक ट्रान्सपोर्टचा आरखडा तयार आहे, असं रईस शेख यावेळी म्हणाले.
पण, सरकारमध्ये इच्छाशक्तीच नाही, ही समस्या आहे. हा माझा सध्याच्या सरकारवर आरोप आहे. आम्हाला ट्रान्सपोर्ट हवा आहे, असं म्हणत त्यांनी सध्याच्या सरकारवर टीकाही केली.