प्रवाशांचं टेन्शन वाढणार, कोकणकन्या पनलेवहून सुटणार, गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम, वाचा सविस्तर

प्रतिनिधी, मुंबई : २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेससाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमांक १०-११ची लांबी वाढवण्याचे काम मध्य रेल्वेकडून सुरू आहे. यामुळे सुरू असलेल्या विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकमध्ये मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस पनवेलपर्यंतच धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस आज, बुधवारपासून महिनाअखेरपर्यंत पनवेलहून धावणार आहे. यामुळे सीएसएमटीहून रात्रीच्या वेळेस मेल-एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गाड्यांचे वेळापत्रक आणि बदल पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

स्थानक – सीएसएमटी ते भायखळा

मार्ग – अप धीमा, अप-डाउन जलद, यार्ड मार्गिका, फलाट १० -१८ दरम्यान सर्व मार्गिका

वेळ – रात्री १२.३० ते पहाटे ४.३० (रोज मध्यरात्री ४ तास)

कालावधी – २२ मे ते ३१ मे
Boat Sinks In Ujani Dam: उजनी धरणात प्रवाशी बोट बुडाली, जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी जाताना घडला अनर्थ; ६ प्रवाशी बेपत्ता,शोधकार्य सुरू

२२ ते ३१ मेदरम्यान बाधित होणाऱ्या मुंबई उपनगरी रेल्वे गाड्या
– सीएसएमटीहून मध्यरात्री १२.१४ कसारा ही शेवटची लोकल.

– कल्याणहून रात्री १०.३४ वाजता शेवटची सीएसएमटी लोकल.

– सीएसएमटीहून पहाटे ४.४७ कर्जत ही पहिली लोकल.

– ठाण्याहून पहाटे ४ वाजता सीएसएमटी ही पहिली लोकल.

– ब्लॉक कालावधीत भायखळा ते सीएसएमटीदरम्यान लोकल धावणार नाही.

३१ मे रोजीच्या रद्द एक्स्प्रेस

१७६१८ नांदेड-सीएसएमटी तपोवन

२२२२४ साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत

दादर स्थानकात अंशत: रद्द करण्यात येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस

– १२५३३ लखनऊ-सीएसएमटी पुष्पक

– ११०५८ अमृतसर-सीएसएमटी

– १२८१० हावडा-सीएसएमटी मेल

– १२०५२ मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी

– २२१२० तेजस-सीएसएमटी तेजस

– १२१३४ मंगलोर-सीएसएमटी

– १२८१० हावडा-सीएसएमटी

पनवेलमध्ये रद्द होणारी एक्स्प्रेस

-१०१०४ मडगाव-सीएसएमटी मांडवी

पनवेलमधून सुटणारी एक्स्प्रेस

– २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या

ठाणे स्थानकात रद्द होणारी एक्स्प्रेस

१२११२ अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस