पोलीस भरतीसाठी वकील-इंजिनिअर-डॉक्टरांचे अर्ज, रोहित पवार यांचे राजकीय व्यवस्थेवर ताशेरे

मुंबई : राज्याभरात उद्यापासून (बुधवार) पोलीस भरती सुरू होणार आहे. विविध पदांसाठी होणाऱ्या भरतीमध्ये एका पदासाठी सरासरी सुमारे १०१ अर्ज आले आहेत. एकूण १७हजार ४७१ पदांसाठी १७.७६ लाख अर्ज आलेले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये डॉक्टर्स, इंजिनीयर, वकीलीचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचाही समावेश असून प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण ४०% हून अधिक आहे. महाराष्ट्रातल्या हीच भीषण बेरोजगारी अधोरेखित करताना राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी राजकीय पक्षांसाठी ‘चिंतन’ ट्विट केले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला कुठले खाते मिळेल, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील यावर मात्र आज जोरदार चर्चा होतेय. मात्र बेरोजगारीवर चर्चा होत नाही. ? इंजिनियरिंग, डॉक्टरकी, वकिली सारखे उच्चशिक्षण घेऊनही नोकरी भेटत नाही म्हणून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवांची की युवांना रोजगार उपलब्ध न करू शकणाऱ्या व्यवस्थेची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
Sainik School Bharti 2024 : सैनिक स्कूल भरतीमध्ये अर्ज करायचा आजचा शेवटचा दिवस; असा करा अर्ज

रोहित पवार काय म्हणाले?

राज्यात उद्यापासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु होत असून १७४७१ पदांसाठी १७.७६ लाख अर्ज म्हणजेच एका जागेसाठी तब्बल १०१ अर्ज आलेले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये डॉक्टर्स, इंजिनीयर, वकीलीचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचाही समावेश असून प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक आहे.
Police Recruitment: पोलिस भरतीसाठी १९ जूनपासून मैदानी चाचणी; चालकांच्या ७५४ पदांसाठी ८ जुलै पासून प्रक्रिया

यामध्ये चूक कोणाची? इंजिनियरिंग, डॉक्टरकी, वकिली सारखे उच्चशिक्षण घेऊनही नोकरी भेटत नाही म्हणून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवांची की युवांना रोजगार उपलब्ध न करू शकणाऱ्या व्यवस्थेची?
नवी मुंबईत पोलिस भरतीची सज्जता, शिपाई पदाच्या रिक्त जागा भरणार; सहा हजार उमेदवारांचे अर्ज

ही बाब अतिशय चिंताजनक असून महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे. पण दुर्दैवाने आपल्या प्रगत महाराष्ट्रात याची चर्चा होणार नाही, कारण हे विषय सर्वसामान्यांचे गोरगरिबांच्या पोरांचे आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला कुठले खाते मिळेल, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील यावर मात्र आज जोरदार चर्चा होतेय. आज सर्वच राजकीय पक्षांनी खऱ्या अर्थाने चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. सर्वसामान्यांचेही विषय कधीतरी मुख्य चर्चेत येतील, अशी अपेक्षा त्यांनी ट्विटमधून व्यक्त केली आहे.

१७ हजार जागांसाठी १७ लाख अर्ज!

मैदानी चाचणी, शारीरिक चाचणी आणि शेवटी लेखी परीक्षा अशा पद्धतीने पोलीस भरती सुरू होणार आहे. यंदाही अव काही हजार जागांसाठी लाखो उमेदवार स्पर्धेत आहेत. पोलीस शिपाई, चालक, बँड्समन, शीघ्र कृती दलातील पदे आणि तुरूंग विभागातील पदांसाठी ही भरती होईल. १७ हजार ४७१ जागांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज आले आहेत. बँड्समनसाठी ४१ जागा असून त्यासाठी ३२ हजार २६ जणांनी अर्ज केला आहे.