पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र टाइम्स आयोजित मटा कॅफे कार्यक्रमात महाविकास आघाडीला राज्यात ३० ते ३५ लोकसभा जागांवर विजय मिळेल, असे भाकित वर्तवले होते. तसेच, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता येणार असेही म्हटले होते. यावर पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली.
अजित पवार यांच्या पक्षाला किती जागा मिळणार हे मतदार ठरवतील. ४ जूनला त्याचा निकालही येईल. अजित पवार यांच्या पाठीशी ४०-५० आमदार आहेत. परंतु कॉंग्रेसचा एकही आमदार चव्हाण यांच्या पाठीशी नाही, असेही पाटील म्हणाले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
पृथ्वीराज चव्हाण यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात काय स्थिती?
महाराष्ट्रात पहिल्यांदाच तीन-तीन पक्षांची आघाडी आहे. असं पहिल्यांदाच झालंय, आतापर्यंत दोनच पक्ष युती-आघाडीत होते. जागावाटपात काही अडचणी आल्या, त्यांना जास्त आल्या. आम्ही सांगली-मुंबईत तडजोडी केल्या, पण एकंदरीत फार मोठा वाद नव्हता. प्रचार मात्र एकदिलाने केला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबाबत निगेटिव्हिटी आहे, पक्ष फोडणं, ५० खोके असेल.. मतदारांमध्ये विश्वासघाताची भावना आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि पर्यायाने महाविकास आघाडीला सहानुभूती आहे. मी सुरुवातीला २५ ते ३० जागा म्हणत होतो, पण आज तो आकडा मी ३२ ते ३५ वर नेलेला आहे. पवार-जयंत पाटीलही तोच आकडा सांगतात, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.