पुणे: वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर दिवसागणिक अधिकाधिक अडचणीत येत आहेत. स्वतंत्र कार्यालय, ऑडी कार, त्यावर महाराष्ट्र शासनाचा उल्लेख, लाल दिवा यामुळे पूजा खेडकरांचा पाय खोलात सापडला आहे. दृष्टीदोष असल्याचा दावा करुन सवलत घेणाऱ्या पूजा यांना ६ वेळा वैद्यकीय तपासणीसाठी एम्सकडून बोलावण्यात आलं. पण त्या गेल्याच नाहीत. आता त्यांच्या ऑडी कारबद्दल महत्त्वाची माहिती उघडकीस आली आहे.
पूजा खेडकर जिल्हाधिकारी कार्यालयात ये-जा करण्यासाठी वापरत असलेली ऑडी थर्मेाव्हेरिटा इंजिनीअरिंगच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. कारची नोंदणी मूळ मालकांच्या नावे आहे. ऑडी कारचे मालक मनोरमा खेडकर यांच्या कंपनीत संचालक पदावर कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांना पोलिसांकडून नोटिस बजावण्यात येण्याची शक्यता आहे.
पूजा खेडकर बाणेरमध्ये वास्तव्यास आहेत. इथे खेडकर कुटुंबाचा आलिशान बंगला आहे. खेडकर वापरत असलेली ऑडी कार कालपर्यंत याच बंगल्याच्या आवारात होती. पण पूजा खेडकर अधिकाधिक अडचणीत येऊ लागताच माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्या घरापर्यंत पोहोचले. यानंतर खेडकर कुटुंबानं कारवर कव्हर टाकलं. पण आता ही कार एकाएकी अन्यत्र हलवण्यात आलेली आहे. ती बंगल्याच्या आवारात दिसत नाही. ती कार नेमकी कुठे गेली याचा शोध पोलीस घेत आहेत.
पूजा खेडकर यांच्या आई मनोरमादेखील अडचणीत आल्या आहेत. कारवाई करण्यासाठी पोलिसांना त्यांनी धमकी दिली आहे. गेटच्या आत यायचा प्रयत्न केल्यास तुम्हाला सगळ्यांना तुरुंगात टाकेन, असा दम त्यांनी दिला. यावेळी तिथे विविध माध्यमांचे प्रतिनिधी तिकडे उपस्थित होते. मनोरमा खेडकर माध्यम प्रतिनिधींच्या अंगावर धावून गेल्या. पोलीस आणि पूजाच्या कुटुंबियांमध्ये बराच वेळ वाद सुरु होता.

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पूजा खेडकर प्रशिक्षणासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्या. त्यांनी प्रशिक्षणाच्या काळात पुणे जिल्हाधिकारी कार्लायलाकडे अवाजवी मागण्या केल्या. त्यांच्या या कारनाम्यांची चर्चा सध्या देशभरात आहे. पंतप्रधान कार्यालयानंदेखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. खेडकर यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे.