अपघात १३ टक्क्यांनी घटले
पुणे शहरात २०२३मध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान ३०५ अपघात झाले होते. त्यामध्ये १०५ जणांचा मृत्यू झाला होता. या वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान ३८२ अपघात झाले आहेत. त्यामध्ये ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या तीन महिन्यात प्राणांतिक अपघात १३ टक्क्यांनी घटले आहेत. पुणे ग्राणीममधील अपघातांची संख्या सहा टक्क्यांनी घटली आहे.
तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक अपघात
पुण्यात अद्याप तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये लोणीकंद, लोणीकाळभोर आणि हडपसर या पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन महत्त्वाचे महामार्ग जातात. तिथेच अपघात जास्त असून, या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी काम केल्यास अपघातांची संख्या आणखी कमी होईल.
नागपूरमध्ये प्राणांतिक अपघात वाढले
राज्यात गेल्या तीन महिन्यांच्या अपघातांचा अभ्यास केल्यास नागपूर शहरात प्राणांतिक अपघातामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. प्राणांतिक अपघात वाढीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर जालना आणि तिसऱ्या क्रमांकावर गोंदिया शहर आहे. अपघात कमी करण्याच्या दृष्टीकोनातून हा अभ्यास गोळा करून त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत.
पुण्यातील अपघात कमी करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित काम केले. त्यानुसार पुण्यातील प्राणांतिक अपघात कमी झाले आहेत. नागरिकांनी दुचाकी चालवताना हेल्मेट घालावे; तसेच कार चालविताना सीट बेल्ट परिधान करणे आवश्यक आहे. अपघात कमी करण्यासाठी आमचे काम सुरूच राहील.
– संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
…
पुणे शहरातील अपघात
वर्ष प्रणांतिक अपघात
२०२२ ३२५
२०२३ ३३४
२०२४ ९२ (जाने. ते मार्च)