पुण्याच्या नेत्यांची कीव; कोरेगावमध्ये दारु, मग मुळशीत नारळपाणी पितात का? वसंत मोरे संतापले

पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या अल्पवयीन मुलाच्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने कल्याणीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री दोघा जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर क्षुल्लक अटींसह आरोपीला जामीन दिल्याने या प्रकरणावरुन देशभरातून संतापाची लाट उमटली होती. वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वसंत मोरे यांनी हिंसक आंदोलन झालं तर त्याला भ्रष्ट प्रशासन जबाबदार असेल, असा थेट इशारा दिला आहे.

कोरेगाव पार्कमध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता, पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते. नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्कमध्येच आहे का? ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या, त्या कोथरूडमधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाईफ विषयी लक्ष द्यावे, अशी टीका वसंत मोरे यांनी केली.

यासोबतच भुगाव, पिरंगुट या भागाकडे म्हणजेच मुळशीकडेही लक्ष द्यावे, तसेच ज्यांनी निवेदन दिली त्यांनी सुद्धा एनआयबीएम कोंढवा भागाकडे सुद्धा लक्ष द्यावे, नाहीतर असं म्हणावं लागेल कोरेगाव पार्कमध्ये जाणारी तरुण पिढी दारू पिण्यासाठी जाते आणि वरील भागांमध्ये नाईट लाईफसाठी जाणारी तरुण पिढी नारळाचे पाणी पिण्यासाठी जाते का? असा सवालही वसंत मोरे यांनी विचारला.
Vishal Patil : काँग्रेसच्या स्नेहभोजनात काय शिजलं? निमंत्रणात बंडखोर विशाल पाटलांचं प्रमुख उपस्थितांत नाव
कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफमध्ये लागेबांधे आहेत, भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील. पोलीस यंत्रणेने फक्त कोरेगाव पार्क टार्गेट न करता संपूर्ण पुणे शहर सुद्धा टार्गेट करावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी म्हणून जर कुठे हिंसक आंदोलन झाली तर त्याला संपूर्णपणे जबाबदार ही भ्रष्ट यंत्रणा असेल, असा इशाराच मोरेंनी दिला.

दरम्यान, ‘अल्पवयीन मुलाने गाडी चालवायला मागितली, तर त्याला गाडी चालवायला दे आणि तू त्याच्या बाजूला बस,’ अशी सूचना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील विशाल अगरवाल याने दिल्याचे त्याच्या चालकाने जबाबात सांगितले,’ अशी माहिती पोलिसांनी बुधवारी न्यायालयात दिली.
Girish Mahajan : भाजपच्या पॉकेटमध्ये कमी मतदान, ‘संकटमोचक’ महाजनांकडून गंभीर दखल, बूथनिहाय रिपोर्ट मागवलाRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

उद्यापर्यंत पोलिस कोठडी

अल्पवयीन चालकाचे वडील व बांधकाम व्यावसायिक असलेले विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ‘ब्लॅक पब’चा कर्मचारी नीतेश धनेश शेवानी (वय ३४, रा. एनआयबीएम) आणि ‘ब्लॅक’च्या बार काउंटरचा व्यवस्थापक जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर) यांना सत्र न्यायालयाने उद्या, शुक्रवारपर्यंत (२४ मे) पोलिस कोठडी सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी हा आदेश दिला.