प्रतिनिधी, पुणे : गेल्या काही वर्षापासून पुणे ते नगर इंटरसिटी सुरू करण्याच्या मागणी आहे. आता नगर-शिर्डी मार्गावरील पुणतांबा येथे ‘कॉर्ड लाइन’चे काम पूर्ण होणार असल्यामुळे थेट पुणे ते शिर्डी इंटरसिटी सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने केली जात आहे. ही गाडी सुरू झाल्यास हजारो नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.
पुणे ते नगर दरम्यान दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. या मार्गावर इंटरसिटी रेल्वेसेवा नाही. त्यामुळे नागरिकांना रस्ते मार्गे प्रवासाला प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे पुणे-नगर रस्त्यावर एसटी, खासगी बस, खासगी प्रवासी वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पुणे-नगर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. पुण्यातून शिरूरपर्यंत पोहचण्यासाठी नागरिकांना काही तास लागतात. वाहनांची संख्या जास्त असल्याने अपघाातचे प्रमाणदेखील जास्त आहे. त्यामुळे नागरिकांकडून पुणे-नगर इंटरसिटी रेल्वे सुरू करण्याची मागणी केली जात होती. मात्र, नगर रेल्वे स्थानकावर कोणत्याही सुविधा नसल्यामुळे ही सेवा सुरू करणे शक्य नव्हते.
पुणे रेल्वे विभागाकडे आता दौंड, नगर, शिर्डी असा भाग आला आहे. याशिवाय पुणे विभागातील पुणतांबा येथे कॉर्ड लाइनचे काम केले जात आहे. येत्या एक-दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे नगरऐवजी थेट शिर्डी ते पुणे अशी इंटरसिटी सुरू केल्यास नगर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. याशिवाय शिर्डीला जाणाऱ्या भाविकांनादेखील फायदा होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता पुणे-शिर्डी-पुणे अशी इंटरसिटी सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.