अनिल देशमुख यांनी ‘एक्स’ सोशल मीडिया अकाऊण्टवर दोन ट्वीट करत राजकीय नेत्यांवर आरोप केले आहेत.
अनिल देशमुख यांचा आरोप काय?
पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न प्यायल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले, हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणून माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये अल्कोहोल पॉझिटिव्ह यावे, याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.
जेणेकरुन या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकल वरील तरुण तरुणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पद्धतीने प्रयत्न सध्या सुरु आहेत, असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन कारचालक मुलाला आणखी १४ दिवस बालनिरीक्षणगृहात ठेवण्यात येणार असून, या मुलाचे मानसोपचार व व्यसनमुक्तीची समुपदेशन सत्रे अद्याप सुरू आहेत.
‘बाल निरीक्षणगृहातून सुटका केल्यास त्याचा ताबा कोणत्या नातेवाइकाकडे द्यायचा हे अद्याप निश्चित नाही. अपघाताच्या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले असून, या मुलाची ओळख सार्वजनिक झाल्याने त्याच्या जीविताला धोका आहे,’ असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील मोनाली काळे यांनी न्यायालयात केला.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
कॉलेज प्रवेशावर चर्चा
बारावी उत्तीर्ण झालेल्या या मुलाच्या कॉलेज प्रवेशाचा मुद्दा बचाव पक्षाकडून उपस्थित करण्यात आला. त्यावर हा मुलगा सुधारगृहात असतानाही त्याची प्रवेश प्रक्रिया होऊ शकते, असे विशेष सरकारी वकील मोनाली काळे यांनी मंडळाच्या निदर्शनास आणून दिले.