संत तुकाराम महाराज पालखी आगमन मार्ग हा विठ्ठल मंदिर आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, वल्लभनगर, नाशिक फाटा, फुगेवाडी, दापोडी, हॅरिस पूल, बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्टेशन, मरिआई गेट चौक, इंजिनीअरिंग कॉलेज चौक असा आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पहाटे दोनपासून बंद केली जाणार आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा आगमन मार्ग हा आळंदी येथून पालखी निघून वडमुखवाडी, चऱ्होली फाटा, दिघी मॅगझीन, बोपखेल फाटा, कळस ओढा, विश्रांतवाडी, फुलेनगर, चंद्रमा चौक, सादलबाबा चौक, संगमवाडी रस्त्याने पाटील इस्टेट चौक, इंजिनीअरिंग कॉलेज चौक असा आहे. त्यामुळे ३० जूनला या मार्गावरील रस्ते पहाटे दोनपासून आवश्यकतेनुसार बंद केले जाणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
शहरातील दोन्ही पालख्यांचा मार्ग
शहरात अगमन झाल्यानंतर दोन्ही पालख्यांचा मार्गच एकच असणार आहे. इंजिनीअरिंग कॉलेज चौक, संचेती चौक, सिमला ऑफिस चौक, वीर चाफेकर चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, तुकाराम पादुका चौक, गुडलक चौक, खंडुजी बाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता विजय टॉकिज चौक, सेवासदन चौक, बेलबाग चौक, बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिर, मोती चौक, सोन्या मारुती चौक, हमजे खान चौक, डुल्या मारुती चौक, नाना पेठ पोलिस चौकी येथून संत तुकाराम महाराज यांची पालखी अरुणा चौक मार्गे निवडुंगा विठोबा मंदिर येथे मुक्काम करील. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी अशोका चौक मार्गे पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामी असणार आहे. या मार्गावरील रस्ते दुपारी बारापासून आवश्यकतेनुसार बंद केले जाणार आहेत.
बंद केले जाणारे रस्ते
– गणेश खिंड रस्ता : रेंजहिल चौक ते संचेती चौक बंद.
– गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता) : खंडुजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक दरम्यान बंद.
– शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक बंद.
– कुंभार वेस चौक, गाडगीळ पुतळा चौक आणि मालधक्का ते शाहीर अमर शेख चौक रस्ता बंद.
– लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौक ते टिळक चौक बंद.
– टिळक रस्त्यावरील पूरम चौक ते टिळक चौक रस्ता बंद.
– शास्त्री रस्त्यावरील सेनादत्त पोलिस चौकी ते खंडुजीबाबा चौक रस्ता बंद.