पुणेकरांसाठी महत्त्वाचे! मतदारयादीत नाव सापडत नसल्यास ‘या’ नंबरवर करा संपर्क, वाचा लिस्ट

प्रतिनिधी, पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी मतदारयादीत मतदारांचे नाव आणि केंद्र शोधण्यासाठी पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात मतदार सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे आता मतदारांना स्वतःचे नाव आणि मतदान केंद्र सापडण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारयादीत नाव शोधण्यासाठी नागरिकांना मदत करण्याकरिता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर पथक तयार करण्यात आले आहे. नागरिकांनी सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत या पथकाशी संपर्क करण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी केले आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघ

कसबा विधानसभा मतदारसंघ : वैभव जंगम ८८८८३६५३६०.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ : रवी जाधव ७४४७७२१२१२.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ : गोकुळ गायकवाड ९६२३८९३८३९.
कोथरूड विधानसभा मतदारसंघ : सुधीर सणस ८९९९३७०६८०.
पर्वती विधानसभा मतदारसंघ : ओंकार माने ९३५९९२९५४५.
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघ : टी. एस. पांगारे, अमोल बनकर, बाळासाहेब चव्हाण ८७९२१८६६८४ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

बारामती लोकसभा मतदारसंघ
दौंड विधानसभा मतदारसंघ : बालाजी सरवदे ९४२१४२३२९५.
इंदापूर विधानसभा मतदारसंघ : इम्रान जमादार ९८९०१७६१५६.
बारामती विधानसभा मतदारसंघ : सचिन निकम ८६६८२७८७१८.
पुरंदर विधानसभा मतदारसंघ : ओंकार कदम ७७५८८३३३७८.
भोर विधानसभा मतदारसंघ : प्रमोद खोपडे ९०९६३५३१०३.
खडकवासला विधानसभा मतदारसंघ : वैभव मोटे ८०५५४४५१९१ यांची नियुक्ती केली आहे.

पवार-ठाकरेंनी लोकांना फक्त भुलथापा दिल्यात, कसलीही सहानुभूती नाही | उदयनराजे

शिरूर लोकसभा मतदारसंघ
जुन्नर विधानसभा मतदारसंघ : स्वप्नील दप्तरे ८६६८९८७०५९.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघ : शुभम गाडेकर ७९७२२१०१६६.
खेड आळंदी मतदारसंघ : मयूर तनपुरे ८३०८२१२९९०.
शिरूर विधानसभा मतदारसंघ : सदाशिव सावंत ७०२०८७५५४५.
हडपसर विधानसभा मतदारसंघ : सपना रहाटे ७७४१९०७३५६.
भोसरी विधानसभा मतदारसंघ : वैभव बर्डे ८४४६५१६८६४.

मावळ लोकसभा मतदारसंघ
मावळ विधानसभा मतदारसंघ : विशाल ओहळ ७३८७९९८२३२.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ : अनिल कुदळे ९९२२५३५२३४.
पिंपरी विधानसभा मतदारसंघ : रोहित परदेशी ७७०९५१०७२३.

वेबसाइटची मदत घ्या

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्राची माहिती शोधण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मतदार चिठ्ठीचे घरोघरी वाटप करण्यात येत आहे. मतदारांनी ही माहिती मिळविण्यासाठी समाजमाध्यमातून फिरणाऱ्या चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.
पालघरमध्ये ‘परभणी पॅटर्न’ नको; गावित यांचा भाजप-सेनेला धोक्याचा इशारा
चुकीच्या संदेशाकडे लक्ष नको

मतदारांना भ्रमणध्वनीवर पाठविण्यात येणारा १९५० क्रमांकावर मतदार क्रमांक पाठविल्यास १५ सेकंदात मतदार चिठ्ठी मिळेल असा संदेश पूर्णत: चुकीचा आहे. केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे किंवा प्रशासनातर्फे यासाठी तयार करण्यात आलेल्या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा. नागरिकांनी असे संदेश पुढे पाठवू नये. चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

‘हेल्पलाइन’द्वारे नाव शोधा

जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात सहायता कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाशी भ्रमणध्वनीद्वारे अथवा निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा ‘व्होटर हेल्पलाइन ॲप’च्या माध्यमातूनही नाव शोधता येईल. नागरिकांनी या सुविधांचा उपयोग करावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.

मतदारयादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत मतदार सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्याशी नागरिकांनी संपर्क करावा.- डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी