पुढील काही तास महत्त्वाचे, मुंबईत जोर वाढणार, रायगडला पावसाचा रेड अलर्ट, वाचा Weather Report

मुंबई: राज्यात गेले दोन-तीन दिवस पावसाने धुमशान घातलं होतं. मात्र, आज सकाळपासून मुंबईतून पाऊस पुन्हा गायब झाला आहे. पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली तरी हवामान विभागाकडून मुंबईसह उपनगरांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, राज्यातील ९ जिल्ह्यांना हायअलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

घाटमाध्यावर मुसळधार पाऊस, रायगडला रेड अलर्ट जारी

कोकण घाटमाध्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, रायगड जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
Marine Drive Suicide: ऑफिसला न जाता TCSच्या कर्मचाऱ्यानं मरिन ड्राइव्ह गाठलं, थोडा वेळ बसली, अंगावरील दागिने काढले अन्…

पुणे, मुंबई, पालघर, ठाण्याला ऑरेंज अलर्ट

त्याशिवाय, पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांनाही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळतील. तर उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. काही ठिकाणी हलक्या सरी बरसतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

धुळे, जळगाव, नाशिक, बुलढाणा, अकोला, नागपूर, नंदुरबारला पावसाचा यलो अलर्ट

तर, धुळे, जळगाव, नाशिक, बुलढाणा, अकोला, वाशिम, नंदुरबार, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, नांदेड, हिंगोली, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहणार असून, काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळेल.

प्रशासन अलर्ट मोडवर

राज्यात मुसळधार पाऊस बरसल्याने नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. अनेक नदी-नाले दुथडे भरुन वाहत आहेत. तर नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलं आहे. रत्नागिरी, रायगडमध्ये जोरदार पाऊस बरसत असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे. अनेकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. तसेच, नागरिकांना सतर्क रागहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.