जूनमध्ये मलेरियाच्या ४४३ रुग्णसंख्येची नोंद झाली, तर गॅस्ट्रोचे ७२२ रुग्ण नोंदवण्यात आले आहे. याच महिन्यात ९९ जणांना कावीळ झाली असून स्वाइन फ्लूची रुग्णसंख्याही धीम्या गतीने वाढत आहे. मागील वर्षी जूनमध्ये ३० जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. तर यंदा जूनमध्ये दहा जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी जून महिन्याच्या तुलनेत यावर्षी या महिन्यामध्ये रुग्णसंख्या कमी असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
उंदरांचा नायनाट
लेप्टोस्पायरोसिस आजाराचा प्रादुर्भाव हा उंदरामुळे होतो. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने उंदरांचा नायनाट केला आहे. विषारी गोळ्या देऊन मारून टाकलेल्या उंदरांची संख्या २०५६ इतकी आहे तर पिंजरे लावून मारलेल्या उंदरांची संख्या २६२३ इतकी आहे. रात्रपाळीमध्ये उंदरांचा नायनाट करण्यात येतो. त्या उंदरांची संख्या ३४ हजार ९६७ इतकी आहे.
‘एचवनएन’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही काळजी घ्या…
– संसर्ग टाळण्यासाठी मास्क घाला.
-गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
-शिंकताना किंवा खोकताना नाक टिश्यू किंवा रुमालाने झाका.
-साबण वा पाण्याने वारंवार हात धुवा.
-डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळा
-ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
-स्वतःहून औषधे घेणे टाळा.
-महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन उपचार घ्या.
आरोग्य शिबिरांची मुंबईतील संख्या- ६९
उपचार दिलेल्या नागरिकांची संख्या- ८००४
मलेरियाचे रक्तनमुने- १,४४,१७९
सर्वेक्षण केलेली लोकसंख्या- २९,८७,३८८
डास प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही
मलेरिया नियंत्रण
तपासणी केलेल्या परिसरांची संख्या- ४७३०
तपासणी केलेल्या डास प्रजनन स्रोतांची संख्या- २८९२८
अॅनोफिलीस डासांच्या उत्पत्तीची संख्या- २७९७
डेंग्यू नियंत्रण
एडीस डासांच्या उत्पत्तीची संख्या- १८७०१
काढून टाकलेले अडगळीचे सामान- ६२९९७
काढून टाकलेले टायर- २५२६