पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! शनिवारी मध्य रात्री विशेष ब्लॉक, ‘या’ गाड्यांवर होणार परिणाम

मुंबई : चर्चगेट परिसरातील वानखेडे स्टेडिअमला जोडणारा पादचारी पूल जुना झाल्याने तो पाडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. पुलाच्या पाडकामासाठी शनिवारी मध्यरात्री १.१० ते रविवारी पहाटे ४.१० दरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक रेल्वे प्रशासनाने घोषित केला आहे. यामुळे रात्री उशिरा धावणाऱ्या लोकल फेऱ्यांमध्ये काही बदल होणार असून काही लोकल फेऱ्या अंशत: रद्द करण्यात येणार आहे.

चर्चगेटला येणारी शेवटची लोकल

शनिवारी रात्री ११.३० ची विरारहून सूटणारी चर्चगेट लोकल रात्री १.१० वाजता चर्चगेटला पोहोचणार आहे. ही चर्चगेटला येणारी शेवटची लोकल असेल. यानंतर ब्लॉक घेऊन पाडकामाची कामे सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई सेंट्रलपर्यंत धावणाऱ्या लोकल फेऱ्या
– शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.१०ची बोरिवली-चर्चगेट
– शनिवारी मध्यरात्रीनंतर ११.४९ची विरार-चर्चगेट
– शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.३०ची बोरिवली-चर्चगेट
– शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.०५ची विरार-चर्चगेट
‘टायटॅनिक’ सिनेमात कॅप्टन म्हणून गाजलेल्या अभिनेत्याचे दु:खद निधन, सिनेसृष्टीला मोठा धक्का
मुंबई सेंट्रलहून सुटणाऱ्या लोकल फेऱ्या (चर्चगेट-मुंबई सेंट्रल रद्द)
– रविवारी पहाटे ४.२५ची मुंबई सेंट्रल-विरार
– रविवारी पहाटे ४.१८ची मुंबई सेंट्रल-बोरिवली