यावेळी कोल्हे म्हणाले की, समोरच्या उमेदवाराला पराभव दिसायला लागला की, दबावतंत्र वापरलं जात. पण सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे. वैयक्तिक टीका करण्याऐवजी देशातील महागाई कमी होणार का? शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार का? बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार का? असे प्रश्न लोक विचारत आहेत.”
देशाच्या पंतप्रधानांना वारंवार यावं लागतंय, आमचा विजय निश्चित
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर असून शिरूर, बारामती, पुणे आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने सभा घेऊन ते मोठे शक्ती प्रदर्शन करणार आहेत. याबाबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, आज सर्वसामान्य जनता ही इंडिया आघाडीच्या मागे उभी आहे. आज देशाच्या पंतप्रधानांना वारंवार इथे यावे लागत आहे. यातच इंडिया आघाडीचा विजय आहे.
तो आमच्या कराचा पैसा, तुमच्या मालकीचा नाही
‘अजित पवार वारंवार निधीबाबत बोलतात, त्यांची वक्तव्ये पाहता सर्वसामान्य नागरिकांच्या करातील हा पैसा असून निधी हा कोणाच्याही मालकीचा नाही’, अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले. विरोधकांकडून होत असलेल्या दमदाटीबद्दल कोल्हे म्हणाले की, ‘अश्या दमदाटीला सर्वसामान्य जनता या माध्यमातून उत्तर देणार आहे. निवडणूक हातातून निसटते तेव्हा अश्या पद्धतीने दमदाटी केली जाते’.