नाव, पक्षचिन्ह नव्हे उमेदवाराचा अनुक्रमांक; पक्षफुटींमुळे गोंधळ, पण कार्यकर्त्यांची शक्कल

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष, दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये पडलेली फूट, या सर्वामुळे यावेळच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांपर्यंत पक्षचिन्ह पोहोचवण्याचे प्रमुख आव्हान महायुती व महाविकास आघाडीसमोर होते. या पार्श्वभूमीवर मुंबईतील जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी सोमवारी मतदानादरम्यान उमेदवाराचे नाव किंवा पक्षचिन्हाऐवजी ईव्हीएम मशिनवर असलेला उमेदवाराचा अनुक्रमांक मतदारांपर्यंत पोहोचविण्याची शक्कल लढवल्याचे दिसून आले. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा क्रमांक पोहोचविण्यासाठी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची फळी सहाही मतदारसंघांत सक्रिय असल्याचे चित्र दिसून आले.

राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेत पडलेली उभी फूट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेले दोन गट यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात होते. पक्षफूट आणि राजकीय पक्षांची झालेली सरमिसळ यांमुळे मतदारांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला होता.
मतदान न केल्यास तीन दिवसाचा पगार कट; यादीत नाव नसलेल्या तरुणीचा संताप, कल्याणमध्ये गोंधळ
उमेदवारांना निवडणूक प्रचारात याची जाणीव होत होती. त्याशिवाय राज्यातील पहिल्या चार टप्प्यांत अपेक्षित पक्षचिन्ह नसल्याची मतदारांनी केलेली तक्रार लक्षात घेता, मुंबईतील मतदानावरही परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे मुंबईत जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी शेवटच्या टप्प्यात ‘अनुक्रमांका’चा प्रयोग अंमलात आणला.
Sharad Pawar : मोदींनी PM पदाची प्रतिष्ठा घालवली; कोणे काळी आरोप करणारे हजारे-खैरनार आता कुठेत? पवारांचा सवालRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

अशिक्षित मतदार किंवा ज्येष्ठ नागरिकांपर्यंत उमेदवारांची माहिती पोहोचविण्यासाठी याआधीही हा प्रयोग करण्यात आला आहे; परंतु यंदा तो मुंबईतील जवळपास सर्वच मतदान केंद्रांवर प्रकर्षाने जाणवला. अनेक मतदारसंघांत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावाचेच आणखीही उमेदवार असल्याने, तसेच फुटीमुळे पक्षचिन्ह बदलले गेल्याने मतदानात फटका बसण्याची भीती होती. त्यातूनच आम्ही ‘अनुक्रमांक’ मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयोग राबविला अशी माहिती दक्षिण मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उच्च पदस्थ पदाधिकाऱ्यांनी ‘मटा’ला दिली.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी :

धुळे- ५६.६१ टक्के
दिंडोरी- ६२.६६ टक्के
नाशिक – ५७.१० टक्के
पालघर- ६१.६५ टक्के
भिवंडी- ५६.४१ टक्के
कल्याण – ४७.०८ टक्के
ठाणे – ४९.८१ टक्के
मुंबई उत्तर – ५५.२१ टक्के
मुंबई उत्तर मध्य – ५१.४२ टक्के
मुंबई उत्तर पूर्व – ५३.७५ टक्के
मुंबई उत्तर पश्चिम – ५३.६७ टक्के
मुंबई दक्षिण – ४७.७० टक्के
मुंबई दक्षिण मध्य- ५१.८८ टक्के