प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांत ७५ हजारांहून अधिक मतदारांनी हक्क बजावताना ‘नोटा’ पसंती दिली. ‘नोटा’ आकड्यांचा विचार केल्यास, काट्याची टक्कर झालेल्या मुंबई उत्तर-पश्चिममध्ये सर्वाधिक ‘नोटा’ मते पडली. मात्र झालेल्या मतदानाच्या तुलनेत टक्क्यांचा विचार केल्यास ‘नोटा’ टक्केवारीत मुंबई दक्षिण-मध्य आघाडीवर आहे.मुंबई शहर व उपनगरांतील उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई व दक्षिण मुंबई या मतदारसंघांमध्ये मिळून ५३ लाख ७३ हजार ४६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरी ५४.०६ टक्के मतदान या सहाही मतदारसंघात झाले होते. त्यातील ७५ हजार २६३ मतदारांनी ‘नोटा’ला मत दिले. त्याची टक्केवारी १.४० इतकी होते. या टक्केवारीनुसार तीन मतदारसंघांत सरासरीहून अधिक मतदान झाले आहे. टक्केवारीनुसार सर्वाधिक १.७४ टक्के ‘नोटा’ मते मुंबई दक्षिण या मतदारसंघात पडली. तेथील एकूण ७ लाख ६९ हजार १० मतांपैकी १३ हजार ४११ मतदारांनी ‘नोटा’ ला मत दिले. आकडेवारीचा विचार केल्यास सर्वाधिक १५ हजार १६१ मते मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात पडली आहेत. तेथील या मतांचा आकडा एकूण मतांच्या तुलनेत १.५९ टक्के आहे.
फुटीची नाराजी मतदानातून
मुंबईतील मतदारांनी दिलेल्या ‘नोटा’ मतांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, या मतांची अधिक टक्केवारी शिवसेना विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या मतदारसंघात आहे. दक्षिण मुंबईत १.७४ पाठोपाठ दक्षिण मध्य मुंबई येथे १.६९ व उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात १.५९ टक्के मतदारांनी ‘नोटा’ला प्राधान्य दिले. त्या तुलनेत भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा शिवसेना, अशी लढत होती त्याठिकाणी या मतांची टक्केवारी १.०८ ते १.२८, अशी सरासरीपेक्षा कमी राहिली आहे. यावरुन शिवसेनेत पडलेल्या फुटीबद्दल मतदार नाराज असल्याचे स्पष्ट होत आहे.

मुंबईतील ‘नोटा’ मतदान
मतदारसंघ | झालेले मतदान | टक्केवारी | नोटा | टक्केवारी |
मुंबई उत्तर | १०,३३,२४१ | ५७.०२ | १३३४६ | १.२८ |
मुंबई उत्तर मध्य | ९,०६,५३० | ९,०६,५३० | ९,०६,५३० | १.०८ |
मुंबई उत्तर पश्चिम | ९,०६,५३० | ५४.८४ | १५,१६१ | १.५९ |
मुंबई उत्तर पूर्व | ९,२२,७६० | ५६.३७ | ५६.३७ | १.१० |
मुंबई दक्षिण | ७,६९,०१० | ५०.०६ | १३,४११ | १.७४ |
मुंबई दक्षिण मध्य | ७,९०,३३९ | ५३.६० | १३,४२३ | १.६९ |