दोन शिवसेना आमनेसामने; देशातला श्रीमंत मतदारसंघ कोणाकडे जाणार?

मुंबई: देशातील सगळ्यात श्रीमंत मतदारसंघ असलेल्या दक्षिण मुंबईत ——- आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीनंतर त्यांनी ——- मतांची आघाडी घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा सामना झाला. यंदा दक्षिण मुंबईत शिंदेसेना विरुद्ध ठाकरेसेना असा सामना झाला. व्यापारी, व्यावसायिक, धनाढ्य, उद्योगपतींच्या मतदारसंघात २० मे रोजी मतदान झालं. इथल्या मतदानाची टक्केवारी ४७.७ टक्के इतकीच होती.

उमेदवार पक्ष विजय/पराजय
अरविंद सावंत शिवसेना (उबाठा)
यामिनी जाधव शिवसेना
अफझल दाऊदनी वंचित
मोहम्मद शोएब बशीर खातीब बसप
मोहम्मद नईम शेख एपीपी

दक्षिण मुंबईत शिंदेसेना विरुद्ध ठाकरेसेना असा सामना झाला. उद्धव ठाकरेंनी खासदार अरविंद सावंत यांची उमेदवारी लवकर जाहीर केली होती. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी बराच वेळ मिळाला. एकनाथ शिंदेंनी जागावाटपात ही जागा खेचून आणली. त्यांनी भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली. त्यांच्यावर करचोरीचे आरोप झाले. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना जाधव यांच्या घरांवर छापे पडले होते. शिंदेंनी बंड केल्यानंतर जाधव यांनी त्यांना साथ दिली. यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव जवळपास १० वर्षे मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले आहेत.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. तब्बल ४४ वर्षे या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. २०१४ मध्ये पहिल्यांदाच इथे शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. अरविंद सावंत इथून विजयी झाले. २०१९ मध्येही त्यांनी खासदारकी राखली. पक्षफुटीनंतर सावंत यांनी उद्धव ठाकरेंची साथ दिली. ते विद्यमान खासदार असल्यानं त्यांनाच तिकीट जाहीर झालं. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा ठाकरेसेनेला मिळाली.

अरविंद सावंत यांनाच तिकीट मिळणार याची जाणीव झाल्यानं दक्षिण मुंबईचे माजी खासदार आणि काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना इथून लोकसभा लढवायची होती. पण तिकीट मिळण्याची शाश्वती नसल्यानं त्यांनी पक्षांतर केलं. शिंदेंनी त्यांची वर्णी राज्यसभेवर लावली. मतदारसंघात त्यांचं चांगलं वर्चस्व आहे. देवरांना मानणारा मोठा वर्ग दक्षिण मुंबईत आहे. या मतदारसंघात अनेक धनाढ्य व्यापारी, व्यावसायिक, उद्योगपती राहतात. त्यांच्याशी देवरांचे उत्तम संबंध आहेत. देवरांच्या पक्षप्रवेशामुळे मतदारसंघात शिंदेसेनेची ताकद वाढली.

दक्षिण मुंबईत ठाकरेसेना आणि भाजपचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. विशेष म्हणजे भाजपच्या दोन्ही आमदारांची नावं लोकसभेसाठी चर्चेत होती. पण शिंदेंनी हा मतदारसंघ आपल्याकडे खेचला. या मतदारसंघात यामिनी जाधव यांच्या रुपात शिंदेसेनेच्या एकमेव आमदार आहेत. शिंदेंनी त्यांनाच तिकीट दिलं. मतदारसंघात काँग्रेसचा केवळ एक आमदार आहे.