दिल बोले हडपसर! पुण्यातील प्राईम मतदारसंघासाठी दादा-भाईंच्या समर्थकांत रस्सीखेच

पुणे : हडपसर विधानसभेतून भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांची वर्णी विधान परिषदेवर लागणार आहे. त्यामुळे आता महायुतीत दोन इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच होणार आहे. एक म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार चेतन तुपे आणि दुसरे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नाना भानगिरे या दोघांपैकी कोणाला संधी मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांसाठी पाच उमेदवारांची यादी भारतीय जनता पक्षाने जाहीर केली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परीणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांच्या नावांचा समावेश आहे.

योगेश टिळेकर यांची वर्णी परिषदेवर लागल्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यासाठी आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे.

सुरुवातीला तटस्थ भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत अनेक आमदार सत्तेत सामील झाले, काहींना मंत्रिपदं मिळाली तर काही तटस्थ राहिले. तटस्थ राहणाऱ्यांपैकी एक चेतन तुपे होते.
Ajit Pawar : देवगिरीवर NCP ची हायव्होल्टेज बैठक, नवाब मलिकही हजर, अजितदादांनी विधानसभेचा आकडा ठरवला

काम करणारा हक्काचा माणूस

तुपेंने आपली भूमिका सुरुवातीला स्पष्ट केली नव्हती, परंतु अखेर त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेला. लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या होत्या. लोकसभेसाठी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले शिवाजीराव आढळराव पाटील उमेदवार होते. त्यांच्यासाठी काम करणारा हक्काचा माणूस हडपसर विधानसभा मतदारसंघात हवा म्हणून चेतन तुपे यांच्यासाठी आग्रही होता.

हडपसर मतदारसंघातून लीड नाही

चेतन तुपे आणि मित्रपक्षांनी काम करूनही आढळराव पाटील यांना हडपसर मतदारसंघातून लीड मिळू शकली नव्हती. त्यामुळे काहीशी नाराजी विद्यमान आमदारांबद्दल आहे. परंतु विधानसभेसाठी पुन्हा संधी मिळणार असा पूर्ण विश्वास चेतन तुपे यांना आहे.
Milind Narvekar : शिक्षण दहावी, मालमत्ता कोट्यवधींची, विधानपरिषदेत ट्विस्ट आणणाऱ्या नार्वेकरांची संपत्ती किती?
शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणारे पहिले नेते म्हणजे नाना भानगिरे. त्यांच्यासोबत पुण्यातले दिगग्ज नेतेही शिंदेंच्या गटात गेले. एकनिष्ठ राहून आतापर्यंत नाना भानगिरे यांनी काम केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघाच्या विकासासाठी भरघोस निधी सुद्धा आणला. मतदारसंघात पक्ष बांधणी चांगल्या पद्धतीने केली. त्यामुळे नाना भानगिरे हडपसर मतदारसंघात इच्छुक आहेत.