मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट हे १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. या लग्नाला देश-विदेशातील नामांकित व्यक्ती हजेरी लावणार आहेत. हा विवाह सोहळा शाही थाटात पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी सर्व स्तरातील दिग्गज व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे यासाठी दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. मात्र या लग्नाला गांधी कुटुंबातील कोणीही उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. सोनिया गांधी अंबानी कुटुंबीयांना शुभेच्छा देणार असल्याचे समोर आले आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी ४ जुलै २०२४ रोजी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना त्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी १० जनपथवर गेले होते. येथे त्यांनी अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी सोनिया गांधींना आमंत्रित केले होते. मुकेश अंबानी स्वतः त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी खास पाहुण्यांना बोलावण्यासाठी गेले होते. गेल्या महिन्यात २६ जून रोजी मुकेश अंबानी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना त्यांच्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण दिले होते.अनंत-राधिकाच्या लग्नाला अनेक राजकीय दिग्गज हजेरी लावणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही गुरुवारी मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईला रवाना झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये अनेक कंपन्यांच्या जागतिक सीईओंचा समावेश आहे.

जगातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये सौदी अरामकोचे सीईओ अमीन नासेर, एचएसबीसी समूहाचे अध्यक्ष मार्क टकर, ॲडोबचे भारतीय वंशाचे सीईओ शंतनू नारायण, मॉर्गन स्टॅनले एमडी मायकेल ग्रिम्स, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे अध्यक्ष जे ली, मुबादलाचे एमडी खाल्दुन अल मुबारक, बीपी सीईओ औचिन मरे यांसारखे व्यावसायिक नेते आहेत. लॉकहीड मार्टिनचे सीईओ जेम्स टॅकलेट, एरिक्सनचे सीईओ बोर्जे एकहोल्म आणि सिंगापूरच्या सरकारी मालकीच्या गुंतवणूक कंपनी टेमासेकचे सीईओ दिलहान पिल्ले या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.