दादा गटाकडून जयंत पाटलांची वाहवा, नवऱ्याला ‘बाई’पण भारी पडले देवा, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. ‘नाफेड’चे अधिकार गोठवले; कांद्याचे दर आता केंद्रीय वाणिज्य मंत्रालय ठरवणार, शेतकऱ्यांना फायदा की तोटा? जाणून घ्या सविस्तर

२. जयंत पाटील यांना नवे नेते डावलत आहेत, अजित पवार गटातील आमदार सुनीलअण्णा शेळके यांचा आरोप

३. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांचा जल्लोष, मध्यरात्री शिवतीर्थाबाहेर केक कापला

४. मुंबईतील इमारतींवर होर्डिंग लावण्यास बंदी; घाटकोपर दुर्घटनेनंतर बीएमसीला जाग, नवीन जाहिरात फलक धोरण ऑगस्टमध्ये काढणार

५. बकरी ईदच्या निमित्ताने बोकड्यांच्या मागणीत वाढ, विविध जातींचे बोकड उपलब्ध, किमती ऐकून चकित व्हाल

६. मर्सिडीज महाराष्ट्रात ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार; रोजगारात मोठी वाढ होण्याचा उद्योगमंत्री उदय सामंत यांना विश्वास

७. मैत्रिणींच्या पार्टीत नवऱ्याला बाईसारखं नटवून नेलं, नातेवाईकांच्या ग्रुपवर व्हिडिओ शेअर, छत्रपती संभाजीनगर मधील जोडपं घटस्फोटाच्या उंबरठ्यावर

८. दारुसाठी पैसे नसल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना रॉडने जबर मारहाण, एक जण ब्रेन डेड; पुण्यातील धक्कादायक घटना

९. जम्मू-काश्मीर व लडाख भारताचेच! अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करणाऱ्या चीन आणि पाकिस्तानला भारताने खडसावले

१०. पाकिस्तानचा संघ मैदानात न उतरताच टी20 वर्ल्डकपच्या शर्यतीतून बाहेर होऊ शकतो, कसं जाणून घ्या…