दादांचे आमदार परतणार माघारी? घरवापसीसाठी पवारांच्या अटी ठरल्या; ‘त्या’ ४ नेत्यांना नो एंट्री?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत १० जागा लढवून ८ जागा जिंकणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. लोकसभेत अजित पवार गटाला बसलेला धक्का आणि त्यानंतर महायुतीत एकटे पडलेले अजितदादा ही स्थिती पाहता त्यांच्याकडचे बरेच आमदार माघारी फिरण्याच्या तयारीत आहेत. त्यातच शरद पवारांनी सरसकट सगळ्याच आमदारांच्या घरवापसीला विरोध नसल्याचं म्हणत सूचक विधान केलं आहे.

ज्यांच्या घरवापसीनं पक्षाला फायदा होईल, त्यांचं स्वागत आहे. पण ज्यांच्या येण्यामुळे पक्षाचं नुकसान होऊ शकतं, त्यांना पुन्हा घेणार नाही, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. १० वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये गेलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील पुन्हा स्वगृही परतल्या आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात पवारांनी घरवापसीबद्दल भूमिका स्पष्ट केली.
तीनदा संवाद झाला, पण कॉल बॅक नाही; लोकसभा अध्यक्षपदासाठी ७२ वर्षांनंतर निवडणूक लागली
भूतकाळात पक्षाचं नुकसान केलेल्या आमदारांना परत घेणार नाही. पण ज्यांनी केवळ पक्षाचा फायदा स्वत:साठी करुन घेतला, त्यांना पुन्हा पक्षात स्थान देण्यात येणार नाही, असं पवार म्हणाले. पक्षाच्या नेते, पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन आमदार आणि नेत्यांच्या घरवापसीबद्दलचा निर्णय घेतला जाईल. त्यासाठी कार्यकर्त्यांचं मत विचारात घेतलं जाईल, अशी पुस्तीही पवारांनी जोडली.
Nilesh Lanke Takes Oath: प्रचारात विखेंकडून चॅलेंज; लंकेंचं थेट लोकसभेतून प्रत्युत्तर, इंग्रजीतून खासदारकीची शपथ
विधानसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी राहिलेला असताना शरद पवारांनी केलेलं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. अजित पवार गटातील बऱ्याच आमदारांना स्वगृही परतण्याची इच्छा आहे. यातील अनेक आमदार शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र सदनातील CM सूट मुक्कामासाठी हवा! कंगनाची अजब मागणी; बड्या नेत्याला फोन, पण…
घरवापसीच्या तयारीत असलेल्या आमदारांची विभागणी शरद पवारांकडून दोन गटांमध्ये करण्यात आली आहे. पक्षाला मजबूत करु शकणारे आणि भूतकाळात अधिकारांचा गैरवापर करुन पक्षाचं नुकसान केलेले असे दोन गटात तयार करण्यात आलेले आहेत. ‘दुसऱ्या गटात अजित पवारांना पक्षात फूट पाडून भाजपसोबत जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या नेत्यांचा समावेश होतो. या नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांपासून स्वत:चा बचाव करायचा होता आणि सत्तादेखील हवी होती,’ अशी माहिती पवार गटातील एका नेत्यानं दिली.

दुसऱ्या गटात प्रफुल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांचा समावेश होतो. शरद पवार या नेत्यांना कदापि पक्षात घेणार नाहीत. पण बऱ्याच आमदारांना पुन्हा पक्षात घेतलं जाऊ शकतं. शरद पवारांनी हिरवा कंदिल दिल्यानंतर त्यांची घरवापसी होईल, असं या पवारांच्या निकटवर्तीय नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं.