पुणे: राज्य मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल चालू मे महिन्यातच जाहीर होणार असून बारावीचा निकाल तिसऱ्या आठवड्यात तर दहावीचा निकाल शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी राज्यात दहावी-बारावीचे निकाल जाहीर झालेले असतील. निकाल लवकर जाहीर झाल्याने अकरावी, डिप्लोमा, आयटीआय आणि विविध प्रकारच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे.राज्य मंडळाकडून दोन्ही परीक्षांचा निकाल १० जूनपर्यत जाहीर केला जातो. मात्र, मंडळातील कार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे या दोन्ही परीक्षांचे निकाल लवकर प्रसिद्ध करण्याकडे कल आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत, दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या दरम्यान घेण्यात आली. बारावीच्या परीक्षेला साधारण १४ लाख विद्यार्थी बसले होते. त्याचप्रमाणे दहावीच्या परीक्षेला १६ लाख विद्यार्थी बसले होते. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष हे परीक्षेच्या निकालाकडे लागले होते. निकालाच्या विविध तारखा काही प्रसारमाध्यमांकडून जाहीर करण्यात होत्या. मात्र, या माहितीला ठोस आधार नव्हता. राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बारावीच्या परीक्षा पहिले झाल्या. त्यामुळे बारावीच्या परीक्षेचा निकाल हा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. त्यानंतर साधारण ८ ते १० दिवसांत दहावीचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. हा निकाल ३१ मे पूर्वी जाहीर होईल, याची काळजी घेण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सांगलीत विशाल पाटलांचं बळ वाढलं! ३१ माजी नगरसेवकांचा पाठिंबा, परिषद घेत भूमिका सांगितली
यंदा निकाल का लवकर जाहीर होतोय ?
प्रलंबित मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांनी मोठा बहिष्कार टाकला नाही. शिक्षकांकडून बारावीच्या परीक्षा प्रक्रियेप्रमाणेच दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षांचे गुण ऑनलाइन पद्धतीने नोंदवण्यात आले. उत्तरपत्रिका तपासणीचे काम मुदतीत पूर्ण होण्यासाठी समन्वय साधून वेळोनेळी बैठका घेण्यात आल्या. त्यामुळे निकाल तयार करण्याला वेग आला.
भाजपचं पाकीट घेऊन पाकीट चिन्हावर उभे राहिलेत, चंद्रहार पाटलांची विशाल पाटलांवर टीका
दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत. हे काम लवकर होण्यासाठी शिक्षक आणि नियामकांनी सहकार्य केले. आता निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या, तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असं राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलं.