त्या होर्डिंगचा मालक अन् १४ जणांच्या मृत्यूला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण?

मुंबई: मुंबईतील घाटकोपरमध्ये एक विशालकाय बेकायदा होर्डिंग कोसळून १४ जणांना आपल्या जीव गमवावा लागला. तर या घटनेत अनेकजण जखमी झाले. या घटनेसाठी भावेश भिंडे नावाची व्यक्ती जबाबदार असल्याची माहिती आहे. भावेश भिंडे हा या होर्डिंग कंपनी आणि जाहिरात एजन्सीचा मालक भावेश आहे.

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू

सोमवारी मुंबईसह उपनगरात वादळी वारा आणि अवकाळी पावसाने दाणादाण उडवली. याचदरम्यान, घाटकोपरमध्ये १२० फूट उंट होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना झाली. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे तर ७० पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. १५ हजार चौरस फुटाचं हे होर्डिंग एका पेट्रोल पंपावर कोसळलं. यावेळी पाऊस असल्याने अनेक वाहनंही पेट्रोल पंपावर थांबलेली होती. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) ने ८८ दुर्घटनाग्रस्तांची नोंद केली आहे, त्यापैकी ७४ जणांमध्ये हे रेक्यू केलेल्या आणि जखमींची नोंद आहे.

कोण आहे भावेश भिंडे?

भावेश भिंडे हे इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत, ही जाहिरात एजन्सी घाटकोपर येथे कोसळलेले होर्डिंग उभारण्यासाठी जबाबदार आहे.

आतापर्यंत काय काय घडलं?

सोमवारी सायंकाळी घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर २५० टन वजनाचे बेकायदेशीर जाहिरात होर्डिंग पडले. या दुर्घटनेत १४ लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.

अचानक आलेलं धुळीचं वादळ आणि पावसानंतर ही घटना घडली. यावेळी ६० किमी प्रति तासाच्या वेगाने वाहत होते. IMD ने याला मान्सूनपूर्व क्रियाकलाप म्हणून नोंदवलं आहे. एनडीआरएफ, एमएमआरडीए आणि इतर पथकांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलं आहे.

होर्डिंग कोसळलं त्यावेळी जवळपास १५० वाहनं पेट्रोल पंपावर उपस्थित होती, काही पावसापासून आश्रय घेण्यासाठी ते पेट्रोल पंपावर थांबले होते. झोनल डीसीपी पुरुषोत्तम कराड यांनी सांगितलं की याप्रकरणी गंभीर दुखापत केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, बीएमसीने इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडला नोटीसही बजावली आहे, १० दिवसांच्या आत परिसरातील आठ बेकायदेशीर होर्डिंग हटवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. अन्यथा, २४ नागरी प्रभागांमधील कोणत्याही होर्डिंगसाठी परवाना रद्द केला जाईल असंही सांगण्यात आलं आहे.

जे होर्डिंग कोसळलं आहे, त्यासह हे ८ होर्डिंग्स गृह विभाग आणि महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळाच्या मालकीच्या जमिनीवर बीएमसीची परवानगी न घेता उभारण्यात आले होते. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यापूर्वी बेकायदेशीर होर्डिंग्जबद्दल तक्रार केली होती, ज्यामुळे बीएमसीकडून जीआरपीला ते हटवण्याची नोटीस देण्यात आली होती.

रहिवासी आणि माजी नगरसेवकांनी कोसळलेल्या होर्डिंगचा पाया आणि स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे अशा बांधकामांच्या सुरक्षिततेबद्दल स्थानिक आता चिंता व्यक्त करु लागले आहेत.