रविवारी पहाटेच्या सुमारास वरळी परिसरात अपघात घडला असून पिडीत कुटुंब न्यायेच्या प्रतिक्षेत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह वयवर्ष २४ हा तरुण गाडी चालवत होता प्रदीप नाखवा त्यांचा पत्नीसह क्रॉफेड मार्केटहून वरळीला परत येत असताना ताशी तीस ते पसत्तीसच्या स्पीडने गाडी चालवत होते. पण भरधाव वेगाने असणाऱ्या बीएमडब्ल्यू चारचाकीने दोघांना धडक दिली प्रदीप बोनटवर आदळले तर पत्नी कावेरी नाखवा यांची साडी कारच्या चाकात अडकून त्या खाली पडल्या प्रदीप याने कार चालकाला गाडी थांबवा अशी विनंती केली पण गाडी चालक मिहीरने गाडी चालवणे सुरुच ठेवले आणि जवळपास वरळी बांद्रा सी लिंक पर्यंत महिलेला खेचत नेले असे प्रदीप नाखवा यांनी सांगितले आहे. घटनेत महिलेचा रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू झाला आहे.
मुंबई पोलिसांनी मिहीर शाहला पकडण्यासाठी लुट आउट सर्क्यूलर काढले आहे इतकेच नव्हे तर मिहीरचा शोध घेण्यासाठी सहा पथके तयार केली आहेत. अपघातापूर्वी जुहूच्या बारमध्ये मिहीरने दारुची नशा केली असा पोलीसांना संशय आहे, कारण अपघाताच्या आधी जूहू परिसरातील एका बारमध्ये मिहीर दिसला होता असे अधिकाऱ्यांना माहिती मिळाली आहे. घटनेत मिहीर याचे वडील आणि गाडीचे मालक राजेश शाह यांना अटक करण्यात आली होती पण मुंबई न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.