तुम्ही पेढे कसले वाटताय?
विधानसभेच्या प्रांगणात गेले दोन दिवस विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन सुरु आहेत. यावर भाष्य करताना शिंदे म्हणाले तुम्ही जंग जंग पछाडले पण काय फायदा झाला नाही सत्तेत मोदी आलेत, तुम्ही लोकसभेचा कशाला आनंद करता, हारलेले लोक पेढे कसले वाटताय, तुम्हाला विरोधीपक्ष नेते पद संसदेत मिळाले त्यांचे पेढे वाटता का? असे म्हणत शिंदेंनी विरोधकांना डिवचले यावर सभागृहात विरोधकांनी गदारोळ सुरु केला.
पुढे सीएम शिंदे म्हणाले..
“अर्थसंकल्प पाहून काल विरोधकांचे चेहरे पांढरेफिकट झाले होते. कारण सरकारने सगळ्या घटकांना न्याय दिला. खोटे नेरेटिव्ह पसरवून तुम्ही लोकसभा जिंकलात मग इतके फुगलात की विधानसभा जिंकली असे समजलात पण कालच्या अर्थसंकल्पाने विरोधकांचा सुपडासाफ झाला होता. दोन वर्षात महायुतीने निर्णय घेतले ते लोकहिताचे आहेत. एवढे करुनही पंतप्रधान पदापासून तुम्ही मोदींना रोखू शकला नाहीत, मी काही लपूनछपून करत नाही दोन वर्षापूर्वी समोरासमोक केले आणि तुम्हाला तुमची जागा दाखवली, ज्यांची खोटे बोलून मते घेतलीत ती परत आता आमच्याकडे आलेत” असा दावा सीएम शिंदेंनी केलाय.
सरकारने महिलांसाठी जशी लाडकी बहिण योजना आणली तशी लाडकी भाऊ योजना पण आणलीच की तरुणांना आम्ही इंटरशीप देवू त्यांना दहा हजार दरमहा वेतन देवू मुलांना सुशिक्षित करु, सरकारने सर्व समाजातील घटकांना न्याय देण्याचे काम अर्थसंकल्पातून केलाय. कोणालाही वंचित ठेवला नाही. राज्यात पहिल्यांदा वारकऱ्यांसाठी वीस हजारांचे अनुदान सुरु केलंय, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे काम सुरु केलंय असे भाष्य शिंदेंनी केला आहे.