तीन दिवसाने आरोपी गजाआड, मिहीरसोबत बारा जणांना अटक; नाखवा कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत

मुंबई – राजेश शहा यांना अटक केल्यानंतर मुंबई पोलीसांनी शहा यांच्याकडून मुलाबद्दल आणि अपघाताबद्दल सगळी माहिती काढून घेतली त्या रात्री नेमके काय घडले यासाठी पोलीसांनी कसून तपास सुरु केला. मिहीर याने जुहूच्या पबमध्ये गेल्याची सुद्धा पोलीसांना माहिती मिळाली आहे त्यानंतर मिहीर याने वरळीत नाखवा दापत्याचा गाडीला धडक दिली. इतक्यावर न थांबला मिहीरने गाडी न थांबवता कावेरी नाखवा यांना गाडीसोबत जवळपास दोन किलोमीटर फरफटत नेले त्यानंतर मिहीरने वडिलांना फोन करुन सगळा प्रकार सांगितला. वडिलांनी मिहीरला बांद्रा इथे गाडी सोडून पळून जाण्यास सांगितले. त्यानुसार मुलगा मिहीर मुंबईच्या बाहेर गेला आणि गाडीत असलेला शहा यांचा कारचालक राजेंद्रसिंग बडावत याला अपघात केल्याची पोलीस स्थानकात कबुली द्याला लावली की मीच अपघात केला.
त्यानं माझ्या बायकोला फरफटवलं, आता मीही त्याला फरफटवतो! बायको गमावलेल्या नाखवांचा संताप

रविवारी सकाळी अपघाताचा सगळा प्रकार घडला आहे, त्यानंतर घटनेवर अधिक तपास करताना आढळून आले राजेश शहा शिंदे गटाचे मोठे नेते आहेत,त्यानंतर सोशल मीडियावर नेटीझन्सकडून न्यायासाठी सरकारवर टीका करण्यात आली यानंतर राजेश शहा यांना अटक करण्यात आली, कारण ज्या चारचाकीने मिहीरने नाखवांच्या दुचाकीला ठोकले होते, ती गाडी राजेश शहा यांच्या नावावर होती. तसेच आरोपीला पळून जाण्यासाठी राजेश शहा यांनी मदत केली यासाठी त्यांना अटक करण्यात आली, पण मुंबई न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडले आहे. तर दुसरीकडे मिहीर अद्याप दोन दिवस फरार असल्याने विरोधकांसह सर्वसामान्यातून सरकारी यंत्रणेवर टीका होवू लागली, मुंबई पोलीसांनी लुकआउट सर्क्यूलर काढत सहा शोध पथके तैनात केली त्यानंतर आज दुपारी मिहीरला मुंबई पोलीसांनी अटक केली आहे.

मिहीरसह मुंबई पोलीसांनी १२ जणांना अटक केली आहे ज्यामध्ये मिहीर शहा त्याला पळून जाण्यासाठी मदत करणारा ड्रायव्हर राजेंद्रसिंग बिडावतसह, मिहीरची आई बहिणी आणि अन्य पळण्यास मदत करणारे नातेवाईक आप्तेष्ट यांचा समावेश आहे. सध्या मिहीर पोलीसांच्या अटकेत आहे तर कावेरी नाखवा यांचे पती प्रदीप नाखवा आणि त्यांची मुले न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.