या आधी देखील प्रवाश्यांच्या होणाऱ्या गैरसोयीसाठी रेल्वे प्रशासनाने अनेक नियम, सेवा व सुविधा लागू केल्या आहेत. अशीच एक सुविधा म्हणजे युटीएस ॲप. या ॲपमार्फत लाखोंच्या संख्येत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीटं काढणे सोईस्कर झाले. पण याच ॲपद्वारे तुम्ही जनरलची तिकीटं ही काढू शकता. या ॲपद्वारे तुम्हाला जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकिटे बुक करता येतील. यापूर्वी मोबाइल लोकेशनपासून २० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या स्थानकांसाठी अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकिटे बुक करता येत होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने तिकीट बुकिंगची ही मर्यादा काढून टाकली असून तुम्ही कुठूनही ऑनलाइन तिकिटे बुक करू शकता.
या स्टेप्सचा वापर करत तुम्ही तिकीट बुक करू शकता
स्टेप १- सर्वप्रथम आपल्या फोनमध्ये प्लेस्टोअरवरून यूटीएस ॲप डाऊनलोड करा.
स्टेप २- ॲपमध्ये तुमचे नाव, मोबाइल नंबर अशी माहिती भरून रजिस्ट्रेशन करा.
स्टेप ३- तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून लॉगिन करा.
स्टेप ४ – रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर आयडी आणि पासवर्ड येईल. ते सबमिट केल्यानंतर यूटीएस ॲपवर लॉग इन होईल.
स्टेप ५- आता तिकीट बुक करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट सिलेक्ट करा आणि पेपरलेस तिकिटाच्या पर्यायावर जा.
स्टेप ६- यानंतर स्टेशनचे नाव आणि प्रवाशांची संख्या टाका. डिटेल्स टाकल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करून गेट फेअरला जा.
स्टेप ७ – त्यानंतर यूपीआय, नेट बँकिंग किंवा कार्डद्वारे पेमेंटद्वारे पेमेंट केल्यानंतर तिकीट ॲपमध्ये दिसेल.