डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात दोघांना जन्मठेप, तिघांची सुटका; CBIच्या विशेष न्यायालयाचा निकाल

पुणे: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात विशेष न्यायालयानं निकाल दिला आहे. पाचपैकी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी विरेंद्र तावडे, ऍड संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची न्यायालयानं पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. दाभोलकर यांची २०१३ मध्ये पुण्यात हत्या झाली होती. त्यांच्या हत्येला पावणे अकरा वर्ष उलटली आहेत.