ठाकरे, पवारांबद्दल सहानुभूतीची लाट, भुजबळांचं निरीक्षण; भाजपच्या ‘त्या’ घोषणेवर स्पष्टच बोलले

मुंबई: राज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे. यंदाची निवडणूक एनडीएसाठी सोपी नसेल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. भाजपनं अब की बार ४०० चा नारा दिला आहे. पण त्यामुळे लोकांच्या मनात चलबिचल सुरु आहे. संविधान बदलाची भीती लोकांच्या मनात असल्याचं निरीक्षण भुजबळांनी नोंदवलं. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

२०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदेंनी बंड करत ४० आमदारांसह भाजपला साथ दिली आणि राज्यात सत्ताबदल झाला. त्यानंतर २०२३ मध्ये अजित पवारांनीदेखील असाश प्रकारे बंड केलं. त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या २ वर्षांत राज्यानं २ प्रादेशिक पक्ष फुटताना पाहिले. त्या पार्श्वभूमीवर होणारी लोकसभा निवडणूक सगळ्याच पक्षांसाठी महत्त्वाची आहे.
मी जीन्स घालणं सोडलं, कारण अमित शहा…; आशिष शेलारांनी सांगितला आठवणीतला किस्सा
अजित पवारांच्या बंडात छगन भुजबळांनी साथ दिली. ‘शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल जनमानसात सहानुभूती आहे. त्यांच्याबद्दल असलेली सहानुभूतीची लाट त्यांच्या भाषणांसाठी असलेल्या गर्दीतून दिसून येत आहे. पण तरीही लोकांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आहे. देशात मजबूत सरकार असावं अशी लोकांची इच्छा आहे,’ असं भुजबळ म्हणाले.
महायुती, महाविकास आघाडीमुळे अजब घडामोड; ठाकरे बंधूंसोबत घडणार विचित्र योगायोग
भाजपनं दिलेल्या अब की बार ४०० बार घोषणेवरही त्यांनी भाष्य केलं. ‘संविधान बदलण्यासाठी ४०० पेक्षा अधिक जागा एनडीएला हव्या आहेत, असा प्रचार केला जात आहे. लोकांच्या मनात काही प्रमाणात शंका आहे. भाजपचे कर्नाटकातील खासदार अनंतकुमार हेगडे यांनीही संविधान बदलाबद्दल विधान केलं आहे,’ याकडेही भुजबळ यांनी लक्ष वेधलं.

नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही? भुजबळांच्या निकटवर्तीयांनं उमेदवारी अर्ज घेतला

संविधान सशक्त आहे. त्यात कोणतेही बदल केले जाणार नाहीत, याची ग्वाही खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. पण तरीही विरोधकांकडून याबद्दलचा प्रचार जोरकसपणे केला जात आहे. याचा परिणाम नेमका काय होणार ते निकालाच्या दिवशीच कळेल, असं भुजबळ म्हणाले.