संसदीय राजकारणात पहिले पाऊल
मिलिंद नार्वेकर यांचे संसदीय राजकारणात हे पहिलेच पाऊल ठरणार आहे. नार्वेकर हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव आहेत. ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. अनेक वर्षांपासून ते ठाकरे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात.
ठाकरेंचे निष्ठावंत
खरं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नार्वेकरांना पक्षात प्रवेशाची ऑफर दिल्याच्या चर्चा अनेक वेळा रंगत असत, अगदी त्यांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या खासदाराविरोधातच मैदानात उतरवण्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. मात्र त्यात तथ्य आढळलं नाही. अर्थातच मिलिंद नार्वेकरांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असता, तर तो ठाकरेंनाही मोठा धक्का ठरला असता.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
एमसीए कार्यकारिणी सदस्य
मिलिंद नार्वेकर हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य असून मुंबई टी२० लीगचे अध्यक्ष आहेत. याशिवाय तिरुपती देवस्थान मंडळाचे सदस्यही आहेत. मात्र आतापर्यंत त्यांची संसदीय राजकारणात एन्ट्री झालेली नव्हती.
नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या चार जागांवरील निवडणुकीत मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज मो अभ्यंकर हे ठाकरे गटाचे दोन शिलेदार विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचले आहेत.
विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर
दरम्यान, विधान परिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने पंकजा मुंडे, माजी आमदार योगेश टिळेकर, माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे.