ठाकरेंची १५ मते, काँग्रेसची साथ, सर्वपक्षीयांचे मदतीचे हात, नार्वेकरांच्या खांद्यावर विजयी गुलाल!

Milind Narvekar : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली आणि महाविकास आघाडीकडून पुरसे पाठबळ नसतानाही तिसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आला. उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून ओळख असलेल्या मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे विधानपरिषदेची निवडणुक अटीतटीची झाली. काँग्रेसकडे महाविकास आघाडीत पुरसे बळ होते मात्र ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी निवडणुकांच्या प्रचाराची धुरा हातात घेतली.

विधानसभेचे अधिवेशन गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु आहे, उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून मिलिंद नार्वेकर सतत महायुतीचे आमदार आणि महाविकास आघाडीचे सगळे आमदार यांच्या भेटीगाठी घेताना विधानसभेच्या परिसरात दिसले. यामध्ये कधी प्रवीण दरेकरांसोबत, कधी प्रसाद लाड यांच्यासोबत, कधी आशिष शेलार यांच्यासोबत तर कधी राष्ट्रवादीचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटीलांच्या सोबत थोडक्यात काय तर मिलिंद नार्वेकर यांनी ठाकरे गटाकडे पुरेसे पाठबळ नसताना विजय खेचून आणलाय.
MCL Election 2024: भाजपची फडणवीसांवर मदार, चमत्काराची अपेक्षा; देवाभाऊ कोणाचे ‘लाड’ करणार? आकडेवारी इंटरेस्टिंग

शेकापचे जयंत पाटील विजयी होतील असे चित्र सर्वाना वाटले होते मात्र महाविकास आघाडीचे गेमचेंजर उमेदवार म्हणून आता मिलिंद नार्वेकर यांच्याकडे पाहिले जात आहे. कारण ठाकरेंकडे पुरसे संख्याबळ नसताना नार्वेकर यांनी स्वबळावर सर्व पक्षातील आमदारांशी संपर्क साधला आणि मतांची गोळा बेरीज केली. ठाकरेंचे विश्वासू म्हणून ओळख असणारे नार्वेकर जेव्हा सर्वपक्षीय नेत्यांशी बोलताना दिसत होते तेव्हा नेटीझन्स कडून टीका करण्यात येत होती पण आता नार्वेकरांची निवडणुकांमागचे राजकीय गणित कळू लागले.


निकाल लागताच मिलिंद नार्वेकर सुरुवातीच्या कलापासून आघाडीवर होते त्यांना तब्बल २३ मत मिळून ते विजयी झालेत. ठाकरे गटाकडे मत आहेत १५ आणि नार्वेकरांना विजयी होण्यासाठी ८ मतांची गरज होती त्यांची जुळवाजुळव नार्वेकर विधानसभेत करताना दिसले, नार्वेकर यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत त्याचाच फायदा त्यांना निवडणुकीत झाला. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनी सोबत बोलताना मिलिंद नार्वेकर यांना कच्चा खेळाडू समजू नका, विधानपरिषदेची पायरी चढण्यासाठी नार्वेकर वाटेल ते प्रयत्न करतील असा शिरसाट यांनी विश्वास बोलून दाखवला होता आणि निकाल प्रत्यक्षात तसाच दिसून आलाय.