मुंबई: लोकसभा निवडणुकीत ९ जागा जिंकणाऱ्या ठाकरेसेनेनं आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी ए आणि बी असे दोन प्लान तयार ठेवले आहेत. ठाकरेंचा प्लान ए महाविकास आघाडीत राहून निवडणूक लढवण्याचा आहे. महाविकास आघाडी सोबत राहून २०१९ च्या फॉर्म्युल्यानुसार त्यांच्या पारंपारिक जागांवर निवडणूक लढेल.
उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये लोकसभेच्या २३ जागा लढवल्या होत्या. विधानसभेला ठाकरेंची शिवसेना १२४ जागांवर लढली होती. तेव्हा शिवसेना एकसंध होती. २०२२ मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली. पक्षाची दोन शकलं झाली. एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. नुकत्यात झालेल्या निवडणुकीत ठाकरेसेना २१ जागांवर लढली. त्यात पक्षाला ९ जागांवर यश मिळालं. आता विधानसभेला ठाकरेसेना ११४ ते १२४ जागांसाठी आग्रही असेल.
महाविकास आघाडीत ठाकरेसेनेसह शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा समावेश आहे. तिन्ही पक्ष प्रत्येकी ९० जागांवर लढतील आणि बाकीच्या जागा मित्रपक्षांना सोडण्यात येतील. मुंबई, कोकण, मराठवाड्यात ठाकरेसेनेला अधिक जागा मिळतील अशी शक्यता आहे. या भागांमध्ये ठाकरेसेनेचं प्राबल्य आहे. विदर्भात काँग्रेसला अधिक जागा सोडल्या जातील. तर पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गट अधिक जागा लढवेल.
आघाडी न झाल्यास ठाकरेसेना सगळच्या सगळ्या २८८ जागांवर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी सगळ्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात ठाकरेंनी काल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला संजय राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई, सुनील प्रभू, राजन विचारे उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर बैठकीत चर्चा झाली.

बैठकीत उद्धव ठाकरेंनी विधानसभेच्या १२५ जागांचा विस्तृत आढावा घेतला. या जागांसाठी स्वतंत्र रुम स्थापन करण्याचा ठाकरेंचा विचार आहे. या कामासाठी थिंक टँक कार्यरत राहील. गेल्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या मतांच्या आधारे ठाकरेसेनेनं १२५ जागांची यादी तयार केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आकडेवारीच्या आधारे या जागांचं वर्गीकरण ए, बी, सी अशा तीन विभागांमध्ये करण्यात आलं आहे.