ठाकरेंकडून खास मिशन हाती, भाजपच्या बालेकिल्ल्यात मारणार मुसंडी? विश्वासू आमदारावर जबाबदारी

मुंबई: लोकसभा निवडणुकीत ९ जागा जिंकणाऱ्या ठाकरेसेनेनं आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. लोकसभेत महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा लढवणाऱ्या ठाकरेसेनेचा स्ट्राईक मित्रपक्षांपेक्षा कमी राहिला. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेसेनेनं मिशन मॅक्सिमम विदर्भ हाती घेतलं आहे. काँग्रेसनं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत कामगिरी केली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी मिशन मॅक्सिमम विदर्भ हाती घेतलं आहे. विदर्भात काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा अधिक जागा लढवण्याचा ठाकरेसेनेचा प्रयत्न आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी देण्यात आली आहे. विदर्भात पक्षविस्तार करुन विधानसभेला मुसंडी मारण्याची योजना ठाकरेसेनेनं आखली आहे.
विधानसभेला काँग्रेस मोठा भाऊ, मविआचा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणाला किती जागा?
आमदार भास्कर जाधव यांच्याकडे विदर्भाचं संपर्कप्रमुखपद देण्यात आलेलं आहे. त्यांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. पूर्व विदर्भातील मतदारसंघांचा आढावा त्यांनी घेतला आहे. शिवसेनेची भाजपसोबत युती असताना ज्या जागा पक्षानं लढवल्या, त्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. भाजप, शिंदेसेनेचे उमेदवार जिथे असतील, त्या जागा लढवण्यास ठाकरेसेना उत्सुक आहे.
Devendra Fadnavis: अजितदादांना धक्का, शिंदेसेनेला वाटा; विधानसभेसाठी भाजपचा प्लान ठरला? फडणवीसांनी गणित मांडलं
विदर्भात पक्ष वाढवण्याची नामी संधी; भास्कर जाधव सज्ज
राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता विदर्भात पक्षविस्तारासाठी चांगली संधी असल्याचं आमदार भास्कर जाधवांनी सांगितलं. ‘शिवसेनेनं १९९० साली पहिल्यांदा मुंबईबाहेर निवडणुका लढवल्या. १९९५ मध्ये शिवसेनेनं सर्वाधिक जागा निवडून आणल्या होत्या. त्यानंतर भाजपनं शह काटशह करुन शिवसेनेच्या जागा कमी केल्या. शिवसेनेची ताकद कमी करुन भाजपनं संधी साधली,’ असं जाधव म्हणाले.

पूर्व विदर्भातील २८ जागांची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली आहे. यातील १२ जागांवर भाजपचे आमदार आहेत. शिवसेनेला पाठिंबा देणारे २ आमदार पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. भंडारा, रामटेकचे अपक्ष आमदार शिंदेंसोबत आहेत. सध्यस्थिती पाहता आम्हाला विदर्भात विस्ताराची संधी आहे, अशी आकडेवारी जाधवांनी मांडली.