ज्यांनी उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात केला ते हिंदू कसे? भेटीनंतर शंकराचार्यांचे शिंदे-भाजपवर शरसंधान

मुंबई: ज्योतिष पीठाचे शंकराचार्य, अविमुक्तेश्वरानंद यांनी सोमवारी शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. भेटीनंतर शंकराचार्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी उद्धव ठाकरेंचा भाजपने विश्वासघात केला असल्याचे म्हणाले. या वक्तव्यावरून आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच मध्येच सरकार फोडणे आणि जनतेच्या जनादेशाचा अपमान करणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले आहेत.
पूजा खेडकरांचे संपूर्ण कुटुंब भ्रष्टाचारी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, रवींद्र धंगेकर आक्रमक
ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून ‘मातोश्री’वर पोहोचले. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला आहे. त्यांच्या विश्वासघाताने आम्ही दु:खी आहोत. जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत आमचे दु:ख दूर होणार नाही. आपण सर्वजण सनातन धर्माचे अनुयायी आहोत. आमच्याकडे ‘पाप’ आणि ‘पुण्य’ची व्याख्या आहे. सर्वात मोठे पाप म्हणजे विश्वासघात. उद्धव ठाकरे यांची फसवणूक झाली आहे. मी त्यांना सांगितले की त्यांना जो विश्वासघात सहन करावा लागला त्यामुळे आम्हा सगळ्यांना दुःख झालं आहे, जोपर्यंत ते पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत आमची वेदना कमी होणार नाही.राज्यातील सरकावर भाष्य करत ते म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेला याचा त्रास झाला आहे. हा त्रास निवडणुकीतही दिसून आला. आपला नेता निवडणाऱ्यांचाही हा अनादर आहे. मध्येच सरकार फोडणे आणि जनतेच्या जनादेशाचा अपमान करणे चुकीचे आहे. कोणाचे हिंदुत्व खरे आहे हे जाणून घेतले पाहिजे. जो विश्वासघात करतो तो हिंदू असू शकत नाही. जो विश्वासघात सहन करतो तो हिंदू असला पाहिजे. कारण त्याचा विश्वासघात झाला आहे. ज्यांनी विश्वासघात केला ते हिंदू कसे असू शकतात? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, आपल्या इथे १२ ज्योतिर्लिंगे आहेत. केदारनाथ हिमालयात आहे. त्यामुळे दिल्लीत आणायची काय गरज आहे. तुम्ही लोकांना का गोंधळात टाकता? केदारनाथमधून २२८ किलो सोने गायब झाले आहे. ते दाखवले जात नाही. तपास होत नाही. आता त्यांना दिल्लीत केदारनाथ बांधून घोटाळा करायचा आहे, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकावरही टीका केली आहे. तर मोदींवर बोलताना ते म्हणाले की, आम्ही नरेंद्र मोदींचे हितचिंतक आहोत. ते आमच्याकडे आले होते. त्यांनी नमस्कार केला. आम्ही त्यांना आशीर्वाद दिला आहे. आम्ही त्यांचे शत्रू नाही. त्यांची चूक झाली तरी आपण बोलतो.