जुन्या भांडणाचा राग, पुण्यातील येरवड्यात एकाच कुटुंबातील तिघांनी सराईत गुंडाला संपवलं

पुणे : राज्यात दिवेसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. मर्डर, बलात्कार, दरोडा अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्याचदरम्यान, पुण्यात देखील धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील येरवडा जेलमध्ये पुर्ववैमनस्यातून एका आरोपीची हत्या करण्यात आलेली आहे. हा आरोपी सराईत गुंड असल्याचं सांगण्यात येत आहे. जेलमधील तिघांनी त्याची एका धारधार हत्याराने हत्या केली आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी प्रवीण रामचंद्र आचार्य, स्वप्निल प्रवीण आचार्य आणि किरण रामचंद्र आचार्य यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर गवसचे आरोपी कुटुंबासोबत पुर्वीपासून वाद होते. गवस याच्यावर मारहाणीसह अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे देखील दाखल होते. काही दिवसांपूर्वीच तो जेलमधून बाहेर आला होता. काल मंगळवारी जुन्या वादातून त्यांचं भांडण झालं. आचार्य कुटुंबीयांनी हत्यारासह त्याचा पाठलाग केला. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सुधीर हा एका दुकानाच्या मागे लपून बसलेला होता. त्याला तिथे गाठून तिघांनी त्याच्या डोक्यात आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात सुधीरचा जागीच मृत्यू झाला.
Pooja Khedkar: पूजा खेडकरचा नवा कारनामा, अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोटा पत्ता अन् बनावट रेशनकार्ड

दरम्यान, येरवडा परिसरात एका सोळा वर्षीय मुलीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्या मुलीच्या अल्पवयीन मित्राने पोलिसांसह अन्य कोणालाही न सांगता गळफास घेतलेल्या मैत्रिणीला परस्पर खाली उतरविल्याने पालकांनी तिच्या घातपाताचा संशय व्यक्त केला. आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने आणि तिच्या मैत्रिणीने मद्यप्राशन केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

तनीषा शांताराम मनवरे (वय १६, रा. शनी आळी, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘येरवडा भागातील शनी आळी भागात आई सुरेखासोबत तनीषा वास्तव्याला होती. तनीषा आणि नागपूर चाळ परिसरात राहणारी तिची मैत्रीण डॉन बॉस्को शाळेत शिकण्यास होती. दोघीही दहावी उत्तीर्ण होऊन पुण्यातील महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतला होता. सोमवारी सायंकाळी तनीषाने तिच्या मैत्रिणीला घरी बोलावून घेतले होते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तिची मैत्रीण वरच्या खोलीत असताना तनीषाने घरातील पंख्याला ओढणीने गळफास लावून घेतला. काही वेळाने तिचा मित्र माघारी घरी आल्यावर तनीषा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यामुळे तिच्या अल्पवयीन मित्राने पोलिसांना माहिती देण्याआधी स्वतः मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर पळत जाऊन भाजी विक्री करणाऱ्या तिच्या आईला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.