मेधा कुलकर्णी काय म्हणाल्या?
काल ज्यांनी आंबेडकरांचा फोटो फाडला ना… (प्रेक्षकांमधून आवाज – आव्हाड-आव्हाड) जितुद्दीन… त्यांनी सुद्धा एकदा असं म्हटलं होतं, की शिवाजी महाराजांना विश्वाजी बाजीराव कुलकर्णी.. ज्यांनी त्यांच्याशी गद्दारी केली.. विषय तो नव्हता चालला.. विषय होता की नरेंद्र दाभोलकरांची हत्या आणि त्या संदर्भात एक चर्चासत्र चालू होतं. विषयांतर करुन ते कुलकर्णी आडनावावर आले.. माझ्या आडनावावर आल्यावर मी… त्यांना सगळा शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवाजी महाराजांशी कोणीकोणी फितुरी केली.. त्यांची आडनावं काय काय होती.. हे सगळं सांगितल्याचं मेधा कुलकर्णी म्हणाल्या.
मी म्हटलं की यांची जात सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही, कारण गद्दाराला जात नसते, धर्म नसतो, तर वृत्ती असते, ज्या कुलकर्णींचा तुम्ही उल्लेख केलात, ते चाकरी करत होते. ते कधीच शिवाजी महाराजांच्या टीममधले नव्हते. ते जिथे जिथे चाकरी करत होते, तिथे प्रामाणिक होते, असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
बाजीराव पेशवेंचा चित्रपट दाखवला, शेंडी हलवून नाचणारे बाजीराव दाखवले. तेव्हा मेधा कुलकर्णी रस्त्यावर उतरली. आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, त्यांना पत्रकारांनी विचारलं, की बाजीराव पेशवेंचा जन्म कधी झाला, त्यांच्या आईचं नाव सांगा, त्यांच्या काकूचं नाव सांगा, त्यांच्या आजीचं नाव सांगा, कार्यकर्त्यांना सांगता नाही आलं, पण म्हणून विषय महत्त्वाचा नाही असं होतं का? सनावळ्या सांगता आल्या नाहीत, म्हणजे विषय महत्त्वाचा नाही असं होतं का? आम्ही न्हाणीघरातलं दृश्य नाही आवडलं, हे महत्त्वाचं नाही का? उद्या दुसरं कोणी आवाज उठवला, तर त्यांना विचाराल का अमुक व्यक्तीचा जन्म कधीचा, असा आहे खोडसाळपणा, आपण सजग राहिलं पाहिजे, असं आवाहनही मेधा कुलकर्णी यांनी केलं.