पुणे महापालिकेतील माजी नगरसेवक योगेश सासणे यांनी शरद पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
योगेश सासणे हे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. अजित पवार यांच्यासाठी सासणेंनी दोन ते तीन जाहीर कार्यक्रमही घेतले होते. त्यानंतर योगेश सासणे यांनी शरद पवार यांची छुपी भेट घेतली होती.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
शरद पवार यांची भेट घेतलीची बाब अजित पवार यांना समजली होती. त्यानंतर अजित पवार यांनी योगेश सासणे यांना सज्जड दम भरला आणि शरद पवार यांच्यासोबतच राहा असंही सांगितलं. योगेश सासणे या प्रसंगानंतर शांत होते, परंतु आज ते राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या व्यसपीठवर दिसले. त्यामुळे योगेश सासणे पुन्हा हडपसर या भागातून अॅक्टिव्ह झाले असल्याचं दिसत आहे.