घाट की कचराकुंडी? कात्रज घाटात शेकडो रक्ताच्या बाटल्यांचा ढीग, स्थानिकांकडून कारवाईची मागणी

प्रतिनिधी, पुणे : पॅथॉलॉजी लॅबमध्ये वापरण्यात आलेली सिरिंज आणि रक्ताचे नमुने असलेल्या शेकडो बाटल्यांची तीन पोती कात्रजच्या घाटात फेकल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. जैववैद्यकीय कचरा धोकादायक असल्याने सार्वजनिक ठिकाणी फेकण्यास मनाई असूनही हे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

कात्रज घाटात रस्त्याच्या कडेला जैववैद्यकीय कचरा

प्राणिमित्र बाळासाहेब ढमाले यांना शुक्रवारी सकाळी कात्रज घाटात रस्त्याच्या कडेला जैववैद्यकीय कचरा फेकल्याची माहिती मिळाली. त्यांनी जाऊन पाहणी केली असता, घाटात तीन पोती भरून सिरिंज आणि रक्ताचे नमुने असलेल्या बाटल्या आढळून आल्या. एका पोत्यातून शेकडो बाटल्या रस्त्याच्या कडेला पडल्याने ढिगारा झाल्याचे दिसून आले. अन्य दोन मोठी पोती भरून साहित्य तिथे ठेवण्यात आले आहे.

परभणीकर, एवढी मतं देतील की देशात माझं नाव गाजेल; महादेव जानकरांना विजयाची १०० टक्के खात्री

‘रक्ताच्या बाटल्यांचा ढीग पाहून मला धक्का बसला. कात्रज घाटात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर आहे. या रक्ताच्या बाटल्या, प्रयोगशाळेतून बाहेर आल्या असल्याने त्यांचा पर्यावरणाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. डोंगर उतारावरून त्या खाली गेल्यास, फुटून वन्यप्राण्यांना आणि पक्ष्यांना संसर्ग होऊ शकतो. वैद्यकीय कचरा माणसासाठीही धोकादायक आहे. महापालिकेने हा कचरा तातडीने उचलावा आणि तो फेकणाऱ्यांचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी ढमाले यांनी केली.